शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवेंचा निषेध

By admin | Updated: May 13, 2017 04:46 IST

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी अनुद्गार काढल्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील राजकीय पक्षांनी निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी अनुद्गार काढल्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. शिवसेनेतर्फे जोडा-मारो आंदोलन करण्यात आले तर काँग्रेसतर्फे निषेधसभा घेण्यात आली.बळीराजा अद्दल घडवेलकर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शिव्या देऊन बळिराजाचा अपमान करणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना आगामी काळात बळिराजा अद्दल घडवेल. शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येऊन सत्ता भोगणाऱ्यांनी शेतकऱ्यांना शिव्या, शाप देण्याच्या आधी लाज वाटली पाहिजे, अशा तीव्र शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी निषेध केला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कलाटे यांच्या नेतृत्वाखाली खा. दानवे यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी खा. दानवे यांच्या चपलेचा हार घातलेल्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी नगरसेविका रेखा दर्शिले, मीनल यादव, नगरसेवक अ‍ॅड. सचिन भोसले, नगरसेवक नीलेश बारणे, चिंचवड विधानसभा प्रमुख गजानन चिंचवडे, विनायक रणसुभ आदी उपस्थित होते. राहुल कलाटे म्हणाले, मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. कर्जाच्या खाईत बुडालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांशी संपर्कयात्रा सुरू आहे. मागील वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तूरडाळीचे भाव गगणाला भिडले होते. यावर्षी शेतकऱ्यांनी विक्रमी तुरीचे उत्पन्न घेतले. ही तूर शासनाने हमीभाव देऊन खरेदी करावी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.’’