शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र मराठे यांचा जामिनासाठी अर्ज दाखल, सोमवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:13 IST

गुंतवणूकदारांची डीएसके यांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना जामीन मिळावा म्हणून शुक्रवारी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला.

पुणे : गुंतवणूकदारांची डीएसके यांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना जामीन मिळावा म्हणून शुक्रवारी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर सोमवारी (दि. २५ जून) विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.मराठे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. कोठडीत असतानाच त्यांना जामीन मिळावा म्हणून त्यांच्यातर्फे अ‍ॅड. सचिन ठोंबरे, अ‍ॅड. शैलेश म्हस्के यांनी अर्ज दाखल केला आहे. डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी मराठे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी मराठे यांना बेकायदा अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेला कळविणे गरजेचे होते. आरबीआय कायदा ५८ इ नुसार तशी परवानगी घेणे गरजेचे असते. अटक केलेल्या अधिकाऱ्यांनी ठेविदारांना ठेवीचे पैसे व्याजासह परत देऊ, असे आश्वासन दिले नव्हते; त्यामुळे त्यांना एमपीआयडी लागू होत नाही, असे या जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.