शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र बऱ्हाटेचा फरार साथीदार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:09 IST

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे हा गेल्या काही महिन्यांपासून फरार असून, पोलिसांनी त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतरही ...

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे हा गेल्या काही महिन्यांपासून फरार असून, पोलिसांनी त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतरही तो अद्याप हाती लागू शकला नाही. त्याच्याबरोबरच फरार असलेल्या व मोक्का कारवाई केलेला प्रशांत पुरुषोत्तम जोशी याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने जेरबंद केले आहे.

प्रशांत पुरुषोत्तम जोशी (वय ४६, रा. कृष्णलीला टेरेस, गांधी भवनमागे, कोथरुड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रवींद्र बऱ्हाटे, देवेंद्र जैन, शैलेश जगताप, संजय भोकरे, प्रेमचंद बाफना सह अनेकांनी संगनमत करून फिर्यादीच्या मालकीची पर्वती येथील जमिनीचा व्यवहार करून त्यांची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यामध्ये मोक्का कलमाचा समावेश करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील रवींद्र बऱ्हाटेचा साथीदार प्रशांत जोशी हाही अनेक महिने फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव व दत्ता सोनवणे यांना प्रशांत जोशी हा त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गांधी भवन येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्या भागात सापळा लावला होता. प्रशांत जोशी तेथे असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी चतु:श्रृंगी विभागाचे सहायक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यापूर्वी या गुन्ह्यातील प्रकाश रघुनाथ फाले (वय ४१, रा. सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. विशाल तोत्रे हा मार्च महिन्यात मरण पावला आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार विजेसिंग वसावे, अशोक माने, सचिन जाधव, दत्ता सोनवणे, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख यांनी ही कामगिरी केली.