शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षे गुंगारा देणाऱ्या रवींद्र बऱ्हाटेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जमीन लाटणे, फसवणूक व धमकावणे़, खंडणी अशा विविध गुन्ह्यासह मोक्का कारवाई केल्यानंतरही गेली दीड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जमीन लाटणे, फसवणूक व धमकावणे़, खंडणी अशा विविध गुन्ह्यासह मोक्का कारवाई केल्यानंतरही गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला गुन्हे शाखेने आज दुपारी अटक केली.

गुन्हे शाखेने बऱ्हाटेची चारी बाजूने कोंडी केली. त्यामुळे त्याला शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन त्याची मालमत्ता लाटण्याचा, तसेच खंडणी वसूल केल्याप्रकरणी रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यावर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर बऱ्हाटे हा फरार झाला होता.

रवींद्र बऱ्हाटेच्या शोधासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. नुकतीच त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयूर यांच्याबरोबर पितांबर धिवार, अ‍ॅड. सुनील मोरे यांना अटक केली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांमार्फत रवींद्र बऱ्हाटेच्या संपर्कात असलेल्या व त्यांच्या जवळच्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी चारी बाजूने फास आवळत आणल्याने सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर मंगळवारी (दि. ६) बऱ्हाटेने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलीस आयुक्तालयात येत असल्याचे कळविले. त्यानुसार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तसेच मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटेला गुन्हे शाखेने अटक केली आहे. सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख अधिक तपास करीत आहे.

बऱ्हाटे याच्याविरुद्ध ३ मोक्का कारवाईसह एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे एकूण २ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची जमिनीची कागदपत्रे, कोरे धनादेश सापडले आहेत. पोलिसांनी त्याची मालमत्ताही जप्त केली आहे. या गुन्ह्यांचे स्वरुप व त्याच्यावर करण्यात आलेली मोक्का कारवाई पाहता आता त्याची पोलिसांच्या तावडीतून सुटका होण्याची शक्यता दिसत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.