शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रावेतचा पूल बनतोय प्रेमी युगुलांचा अड्डा

By admin | Updated: April 26, 2017 03:57 IST

पुनावळे रावेत बंधाऱ्यावरीवल संत तुकाराममहराज हँगिंग पूल गेल्या काही वर्षांपासून प्रेमी युगुलांचा अड्डा बनला आहे. तरुण तरुणींचे अश्लील चाळे

वाकड : पुनावळे रावेत बंधाऱ्यावरीवल संत तुकाराममहराज हँगिंग पूल गेल्या काही वर्षांपासून प्रेमी युगुलांचा अड्डा बनला आहे. तरुण तरुणींचे अश्लील चाळे आणि दररोजचा धांगडधिंगा यामुळे स्थानिक रहिवाशांना मान शरमेने खाली घालून ये-जा करण्याची वेळ आली. या प्रेमी युगुलांचा बंदोबस्त केण्याची मागणी नागरिक व सामाजिक संघाटनांकडून होऊ लागली आहे. दुपारच्या चार नंतर जस-जसा दिवस सूर्यास्ताकडे झुकू लागतो, तसा हा पूल तरुण तरुणींच्या गदीर्ने फुल होतो. मात्र, हे महाविद्यालयीन तरुण गप्पा मारत बसतील तरीही ठीक. मात्र यापुढेही जाऊन कुठलीही मनात लाज न बाळगता इथे लज्जा उत्पन्न होईल, असे चाळे तरुण तरुणी बिनबोभाट उघड्यावर करतात. त्यामुळे येथील रहिवाशांना स्वत:च्याच घरी जाताना मान खाली घालून जावे लागत आहे. स्थानिकांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत असल्याने मातृत्व धर्मदाय संस्थेने यावर काहीतरी तोडगा काढण्याची विनंती वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाकड, रावेत, पुनावळे, ताथवडे, आकुर्डी या भागांत अनेक महाविद्यालये आहेत़ यातील बहुतेक विद्यार्थी-विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये किंवा खोली करून राहतात़ त्यामुळे या सर्वांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कॉलेज आणि हॉस्टेलपासून जवळच आणि आल्हाददायक वातावरण असलेला हा हँगिंग ब्रिज तरुणांचा जणू हक्काचा कपल डेस्टिनेशन (पॉइंट) बनला आहे. पुलाच्या आजूबाजूचा परिसर मोकळा असल्याने सायंकाळी या ठिकाणी आपोआपच रमणीय वातावरण तयार होते़ या पुलाला काहीजण लंडन ब्रिज तर काही जण हावडा ब्रिजसुद्धा म्हणतात़ प्रेमी युगुल येथे गर्दी करतात़ प्रेमाचे उघड प्रदर्शन करतात़ प्रेम आंधळे असते वैगेरे ठीक आहे, मात्र त्यांच्या या वागण्याने स्थानिकांवर डोळे बंद करून येथून जाण्याची वेळ आली आहे. येथे फिरायला येणारे तरुण-तरुणी आपली दुचाकी व चार चाकी पुलावर रस्त्यातच उभी करून बसतात़ त्यामुळे वाहतुकीचा खेळ खंडोबा होत आहे़ तर या मुलींच्या मागे मागे फिरणाऱ्या रोड रोमियोंची टोळी देखील येथे भटकत असते़अनेक वेळा पुलावर किरकोळ स्वरूपात वाद होतात; याची वेळीच दखल घेऊन पोलिसांनी बंदोबस्त करावा अन्यथा एखादी मोठी घटना होऊ शकते, असे तुषार पवार यांनी व्यक्त केली.(वार्ताहर)