शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

रेशनिंगचा काळाबाजार

By admin | Updated: May 18, 2015 23:04 IST

पुरंदर तालुक्यात अगदी महसूल विभागाच्या सहकार्याने खुलेआम रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.

सासवड : पुरंदर तालुक्यात अगदी महसूल विभागाच्या सहकार्याने खुलेआम रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे. वनपुरी गावचे माजी सरपंच आणि सोसायटीचे चेअरमन एकनाथ महादेव कुंभारकर यांच्या घरात स्वस्त धान्य दुकानातील तब्बल ३६५ पोती तांदूळ आढळून आला आहे. तसेच, सासवड येथील छाप्यात ट्रकसह १०० पोती गहू सापडले. पोलीस आणि महसूल यांनी संयुक्तपणे कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची तक्रार भाजपा युवाध्यक्ष साकेत धनंजय जगताप यांनी महसूल विभागाकडे केली होती. मात्र, याची दखल घेतली जात नव्हती. म्हणून त्यांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे तीन महिन्यांपासून सापळे लावले होते. आज सोमवार, दि. १७ रोजी तांदूळ कुंभारकर यांचेकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जगताप यांनी सहकार्यासह थेट त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्या वेळी ट्रक दारात उभा होता. त्यामधून तांदूळ उतरविण्याचे काम सुरू होते. त्यांना पाहताच चालकाने धूम ठोकली व पळून गेला. त्यानंतर त्यांनी तहसीलदार संजय पाटील यांना याबाबत खबर दिली, त्यांनी नायब तहसीलदार दिनेश पारगे यांना तेथे पाठविले. तसेच पुरवठा निरीक्षक चिंतामणी दत्तात्रय जगताप, गोडाऊन किपर बी़ एन. पठाण, सासवडचे पोलीस उपनिरीक्षक नारायण गिते, पोलीस हवालदार विकास मोहिते, वाहनचालक पोपट शेंडकर, वनपुरीचे महसूल कर्मचारी संतोष कुंभारकर यांनी कारवाई करीत सर्व माल ताब्यात घेतला. त्या वेळी तेथे घरामध्ये ५० किलोची १३३ पोती, तर ट्रकमध्ये २३० पोती, असा एकूण १८१.५० क्विंटल तांदूळ आढळून आला. तसेच तेथे ५० किलो वजनाची शासकीय धान्याचा शिक्का असलेली सुमारे ४५० पोती आढळून आली. सोमेश्वर साखर कारखान्याची पोती आणून त्यामध्ये तांदूळ भरून ठेवला होता. तो सर्व माल महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतला.त्यानंतर सासवड येथे उद्योजक बिरजीभाऊ नवलखा यांच्या पीएमटी बसस्थानकजवळील गोदामावर छापा टाकला असता, तेथे ट्रकमध्ये ५० किलो वजनाची सुमारे १०० पोती गहू आढळून आले. त्यापैकी एका पोत्यावर शासकीय धान्याचा शिक्का होता, तर इतर पोत्यांवर खासगी नावे लिहिण्यात आली होती. महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांनी कारवाई करून ट्रक मुद्देमालासह ताब्यात घेतला. त्यानंतर उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तोपर्यंत माल गायब ही कारवाई सुरू असतानाच सासवडचे व्यापारी संजय सीताराम उबाळे (वय ४३, रा. धान्यबाजार सासवड) हे तेथे आले व त्याने हा माल बाजारातून घेतल्याचे सांगितले. तसेच मोबाईल फोनवरून इतर सर्व व्यापाऱ्यांना कारवाईची माहिती दिली. तोपर्यंत ठिकठिकाणचा सर्व माल गायब करण्यात आला.