शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगचा काळाबाजार थांबणार

By admin | Updated: June 15, 2017 04:48 IST

स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी हवेलीतील सुमारे सत्तर रेशनिंग दुकानदारांना बायोमेट्रिक प्रणाली मशिन्सचे वाटप करण्यात आले. त्याविषयीचे

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी हवेलीतील सुमारे सत्तर रेशनिंग दुकानदारांना बायोमेट्रिक प्रणाली मशिन्सचे वाटप करण्यात आले. त्याविषयीचे प्रात्यक्षिक व योग्य प्रशिक्षण तालुक्यातील दुकानदारांना देण्यात आले आहेत. सर्व व्यवहार बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना पुरवठा विभागाद्वारे देण्यात आल्या आहेत.प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, सहाय्यक पुरवठा अधिकारी अनिल कांरडे, हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, नायब तहसीलदार उत्तम बडे, तालुका पुरवठा निरिक्षक अविनाश डोईफोडे उपस्थित होते.सर्वसामान्यांना शासकिय कोट्यातील स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहे. काही रेशनिंग दुकानदार आर्थिक फायद्यासाठी शासकीय कोट्यतून आलेल्या धान्यांची परस्पर विल्हेवाट लावून नागरिकांना धान्याचा साठा या वेळी आला नसल्याची उत्तरे देत असल्याचे बहुतांशी प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले. हा गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक प्रणाली यंत्राचा अवलंब केला असल्याची माहिती पुरवठा कार्यालयातून देण्यात आली.हवेली तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांना बायोमेट्रिक मशिन्सचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी उपस्थित दुकानदारांच्या सर्व शकांचे निरसन करण्यात आल्याने स्वस्त धान्य दुकानदारांनी समाधान व्यक्त केले.बायोमेट्रिक प्रणालीचा वापर संपूर्ण पुणे जिल्ह्यात करावयाचा असून, त्याची सुरुवात हवेलीमध्ये केली आहे. या प्रणालीचा वापर न करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल.- दिनेश भालेदार, जिल्हा पुरवठा अधिकारी