शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारच हिरावून घेतायत गरिबांच्या तोंडचा घास

By admin | Updated: March 28, 2016 03:13 IST

दारिद्र्यरेषेखाली लोकांना किमान दोन वेळचे अन्न मिळावे याकरिता दोन रुपये किलोने गहू, तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य देण्यास

पुणे : दारिद्र्यरेषेखाली लोकांना किमान दोन वेळचे अन्न मिळावे याकरिता दोन रुपये किलोने गहू, तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य देण्यास वेगवेगळी कारणे सांगून रेशन दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे उजेडात आले आहे. त्याचबरोबर अन्नसुरक्षा योजनेच्या यादीत अनेक दुबार व बोगस नावे टाकून मोठ्या प्रमाणात धान्य लाटले जात असल्याचे दिसून आले आहे.केंद्रामध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी २ फेब्रुवारी २०१४ पासून अन्नसुरक्षा योजना कार्यान्वित केली. याअंतर्गत शहरातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५९ हजारपर्यंत आहे, त्यांचा या योजनेत लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दारिद्र्यरेषेखालील ४ लाख कुटुंबांचा यामध्ये समावेश झाला आहे. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना मोलमजुरी करणाऱ्या, अत्यंत हलाखीचे आयुष्य जगणाऱ्या, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, प्रत्यक्षात या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अन्नसुरक्षा योजनेचे धान्य घ्यायला रेशन दुकानांमध्ये गेल्यास आता फक्त तुमच्याकडे गॅस आहे, मग धान्य मिळणार नाही...मालच आला नाही...आता फक्त गहूच आलाय... तांदूळ संपलाय... माल कमी आलाय... पुढच्या महिन्यात या अशी वेगवेगळी कारणे सांगून धान्य देण्यास रेशन दुकानदारांकडून नकार दिला जातो. प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात निम्मेच धान्य दुकानदारांकडून दिले जाते, असे या योजनेतील लाभार्थी फईमा पठाण यांनी सांगितले.अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची यादी लोकहित फाउंडेशनचे अजहर खान यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळविली. त्यामध्ये अनेक दुबार व बोगस लाभार्थींची नावे समाविष्ट असल्याचे दिसून आले. त्यातील काही नावे सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचीही होती. दुबार व बोगस लाभार्थ्यांच्या नावावरील धान्य रेशन दुकारांदाराकडून परस्पर लाटले जाते. त्यांनी किमान गरजू लाभार्थींना तरी नियमाप्रमाणे योग्य धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अजहर खान यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत २ रुपये किलोने मिळणारे गहू, तांदूळ नंतर काळ्या बाजारामध्ये त्याची १५ रुपये किलोने विक्री केली जाते, असा आरोप खान यांनी केला आहे. (प्रतिनिधी)गरजूंपर्यंत धान्य पोहोचविण्यात अपयशशहरामध्ये फुटपाथवर, नदीच्या काठावर राहणारे तसेच हलाखीचे जीवन जगत असलेली अनेक कुटुंबे आहेत. अन्नसुरक्षा योजनेतील धान्याची खरी गरज या कुटुंबीयांना आहे. मात्र त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांच्यापर्यंत ही योजनाच पोहोचू शकलेली नाही. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भटक्या कुटुंबांना तात्पुरते रेशनकार्ड देऊन धान्य देण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यामध्ये फार यश आलेले नाही. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीत एका नगरसेवकाच्या आईचे, रेशनदुकानदाराचे नाव असल्याचे माहिती अधिकारांतर्गत उजेडात आले आहे. वार्षिक उत्पन्न ५९ हजारपेक्षा कमी असण्याची अट असतानाही अशा पद्धतीने अनेक बड्या लोकांची नावे यात समाविष्ट आहेत.