शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदार फेडरेशन आक्रमक

By admin | Updated: March 25, 2016 03:42 IST

रास्त भाव धान्य दुकान व हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारकांच्या विविध मागण्या व समस्यांकडे अन्नधान्य पुरवठामंत्री गिरीश बापट जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ

पिंपरी : रास्त भाव धान्य दुकान व हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारकांच्या विविध मागण्या व समस्यांकडे अन्नधान्य पुरवठामंत्री गिरीश बापट जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ आॅल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशने आक्रमक पवित्रा घेतला आहे, असे माजी खासदार व संस्थेचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये गहू, तांदूळ फक्त बीपीएल अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या लेव्ही साखरेचा कोटासुद्धा द्वारपोच योजनेत समाविष्ट करावा. हमाली यांची अंमलबजावणी व्हावी. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेप्रमाणे न्यायमूर्ती डी. पी. वाधवा समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यात अन्न धान्य महामंडळ स्थापन करावे. राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्व रास्त भाव धान्य दुकान व हॉकर्स किरकोळ केरोसीन परवानाधारकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अंमलबजावणी करावी. तमिळनाडूत शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सुविधा मिळतात, आदी मागण्यांसाठी ४ एप्रिलला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)