शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारकांना आधारकार्डची सक्ती शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:26 IST

केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकाधारकांना आधारकार्डची करण्यात आलेली सक्ती शिथिल करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंचे नुकसान होऊ नये..

पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकाधारकांना आधारकार्डची करण्यात आलेली सक्ती शिथिल करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंचे नुकसान होऊ नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ग्राहकांना आधार का काढलेले नाही, हे लेखी द्यावे लागणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, अशा ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानांमधून येत्या १ आॅक्टोबरपासून स्वस्त धान्य वितरित करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता.गरजूंनाच स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, म्हणून आधारकार्ड लिंक करण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र सद्य:स्थितीमध्ये आधारकार्ड काढण्यात येत असलेल्या अडचणी, अपुरी केंद्रे यामुळे आधारकार्ड नसलेले गरीब लाभार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणाºया शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाहीत, त्यांना स्वस्त धान्य देण्यात येणार नाही. मात्र, शिल्लक राहिलेले हे धान्य गरजूंना विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आधारशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यास मनाई करण्यात आल्याने गोरगरिबांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर धान्य मिळाले नसते तर अडचण निर्माण झाली असती. गरजूंच्या नावाखाली हे धान्य काळ्याबाजारात जाण्याची भीती निर्माण झाली होती. पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन केले होते.तूर्तास ही सक्ती मागे घेण्यात आली असून दिवाळीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या काळात आधार क्रमांकाशिवाय धान्य घेणाºया ग्राहकांना आधार नसल्याची लेखी कारणे द्यावी लागणार आहेत. तशा सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आल्याचे पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड