शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी सरदारांना सुभा सांभाळण्यातच रस

By admin | Updated: February 1, 2017 05:14 IST

सगळ्या सरदारांना सुभे सांभाळ्यातच रस, निर्णयस्वातंत्र्य नसल्याने कुढतच मान्य केले जाणारे निर्णय आणि बीडीपीसारख्या धोरणात्मक बाबींवरच तीव्र मतभेद यामुळे

पुणे : सगळ्या सरदारांना सुभे सांभाळ्यातच रस, निर्णयस्वातंत्र्य नसल्याने कुढतच मान्य केले जाणारे निर्णय आणि बीडीपीसारख्या धोरणात्मक बाबींवरच तीव्र मतभेद यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उघड गटबाजी दिसत नसली तरी अंतर्गत पातळीवर एकमेकांवर कुरघोड्या होत आहेत. उमेदवारनिवडीमध्ये त्याचे प्रत्यंतर येत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस आपली ताकद वाढविण्यासाठी विधीनिषेध बाळगत नाही, असा आरोप कॉँग्रेसकडून नेहमीच केला जातो. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब आणखीच अधोरेखित झाली. संयुक्त चर्चा सुरू असतानाही काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रवेश देण्याची दादागिरी राष्ट्रवादीतीलच अनेक नगरसेवकांना आवडलेली नाही. अंतर्गत गटबाजीतून पक्षाला धक्का बसेल, या भीतीतून काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा आग्रह खुद्द अजित पवार यांच्याकडूनच धरला जात होता. मात्र आघाडीची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्याची दादागिरी झाली व आघाडीवर पाणी पडले. अजित पवार यांचे वर्तुळ, खासदार सुप्रिया सुळे यांची लॉबी, शरद पवार यांना मानणारे काही ज्येष्ठ व शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्याविरोधात काम करणारा आमदार अनिल भोसले यांचा स्वतंत्र गट राष्ट्रवादीमध्ये काम करीत असतात. पक्षाच्याच कार्याध्यक्षांच्या घरावर महिला आघाडीने मोर्चा काढण्याचा प्रकार या गटबाजीतूनच झाला. त्याहीपूर्वी तब्बल १० जणांनी शहराध्यक्षांच्याविरोधात उघडपणे आघाडी तयार करून त्यांना बदलण्याची मागणी केली होती. पक्षाच्या महापौरांनी थेट सर्वसाधारण सभेत काँग्रेस नगरसेवकाच्या साह्याने गणपूर्तीची विचारणा करून स्वपक्षाच्या नगरसेवकाचा विषय लांबणीवर टाकण्याचा प्रकार केला होता. त्या नगरसेवकाने राजीनाम्याची धमकी देऊन त्यांच्यावर कुरघोडी केली. विधान परिषद निवडणूक मतदानाच्या वेळी शहराध्यक्षांनी त्याकडे पाठ फिरवण्याची गोष्ट तर अगदी अलीकडची.ही गटबाजी तीव्र आहे. त्यामुळेच पक्षाच्या प्रचारात कुठेही एकसंधपणा दिसत नाही. १० वर्षांच्या सत्तेतून सुभेदार तयार झाले असून त्यांनी आपापले सुभे तयार केले आहेत. ते सांभाळण्यातच त्यांना रस आहे, अशी तक्रार पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडून खासगीत केली जात असते. त्यात तथ्यही दिसते. महापौरपद सांभाळलेल्या व्यक्तीने शहराच्या प्रचारात व्यस्त असावे, अशी अपेक्षा बाळगण्यात येते. राष्ट्रवादीच्या एकाही माजी महापौराने असे केलेले दिसत नाही. शहराध्यक्षांना असलेला विरोध हेच त्याचे कारण असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच त्यांची वेगळी आघाडी व शहराध्यक्षांची वेगळी असे चित्र राष्ट्रवादीमध्ये तयार झाले आहे.(प्रतिनिधी)उपनगरांतच जोर : मध्यवर्ती भागात प्रवेश करणे अवघडचउपनगरांमधील वर्चस्वाच्या जोरात राष्ट्रवादीला शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश करायचा आहे, पण सुभेदारांच्या सहयोगाअभावी ते शक्य होत नाही, अशी पक्षसंघटनेत काम करणाऱ्यांची तक्रार आहे. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार असलेल्या सुरेश कलमाडी यांचे काम राष्ट्रवादीचे काही नगरसेवक करीत नव्हते. त्यांना थेट शरद पवार यांनी तंबी दिली होती. दादागिरीमध्येही त्यांच्या शब्दाचा दबदबा अजून कायम आहे, मात्र सुभेदारांची तक्रार त्यांच्याकडे करायची कोणी ही संघटनेत काम करणाऱ्यांपुढची समस्या आहे. त्यातून दादा बिघडले तर काय, अशी भीतीही आहे.महापालिका निवडणुकीसाठी सर्वात आधी जाहीरनामा घोषित झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा, पण त्यालाही अनेक सुभेदार उपस्थित नव्हते. पक्षसंघटनेकडून कार्यकर्ते, इच्छुक यांच्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले गेले, त्याकडेही अनेकांनी पाठ फिरवली. आताही सगळे आपापल्या सुभ्यातच प्रचार करण्यात दंग आहेत. भाजपाकडून निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या सत्तेवर अनेक आरोप केले जातात. त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल असा नेताच राष्ट्रवादीत नाही. सत्तेचा वाटा मुठभरांनाचपक्षाच्या उपनगरांमधील वर्चस्वामुळे विशिष्ट लोकांचाच पक्ष हा शिक्का राष्ट्रवादीवर बसला आहे. काही जणांना सत्तापद देऊन तो पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात पक्षाला पुरेसे यश आलेले नाही, असे दिसते. त्यामुळेच सत्तेचा सर्वाधिक वाटा मोजक्याच लोकांना मिळाला, असे बोलले जात आहे.