शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

मंचरला वृद्धेवर बलात्कार; तरुणाला अटक

By admin | Updated: January 24, 2017 01:46 IST

७७ वर्षांच्या वृद्धेवर २८ वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना रविवारी रात्री वडगाव काशिंबेग फाटा येथे घडली. याप्रकरणी

मंचर : ७७ वर्षांच्या वृद्धेवर २८ वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना रविवारी रात्री वडगाव काशिंबेग फाटा येथे घडली. याप्रकरणी अमोल चिंतामण वाळुंज (वय २८, रा. वाळुजंवाडी) याच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वृद्ध महिला वडगाव फाटा येथील शेतातील घरात एकटीच राहते. आरोपी अमोल वाळुंज हा सायंकाळी वृद्धेच्या घरासमोर असलेल्या शाळूच्या पिकालगत झोपला होता, त्या वेळी वृद्धेच्या मुलाने त्याला हटकले असता पाणी प्यायला आल्याचे कारण त्याने सांगितले. त्या वेळी ‘पाणी पिऊन घरी जा,’ असे वृद्धेच्या मुलाने आरोपीला सुनावले होते. रविवारी रात्री ८ ते ९.३० च्या सुमारास घराच्या दरवाजाला धक्का मारून पत्र्यावर दगड टाकल्याचा आवाज झाला. त्या वेळी नातू आला असावा, असे समजून त्या वृद्धेने घराचे दार उघडले. वाळुंज घरात घुसला. वृद्धेशी झटापट करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो पळून गेला. रात्री वृद्धेचा नातू घरी आला. सकाळी या वृद्धेने तिच्या मुलाला झालेला प्रकार सांगितला. मुलाने पत्नीला घटना सांगून आरोपी अमोल वाळुंज याच्या घरी जाऊन जाब विचारला.आरोपी अमोल वाळुंज याला झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारण्यात आला. त्याला वृद्धेच्या समोर आणले तेव्हा त्याने सर्व प्रकार कबूल केला. त्या वेळी त्याने ‘मी चुकलो, मला माफ करा,’ अशी गयावया केली. संतप्त नागरिकांनी अमोल याला चोप दिला. वृद्धेच्या सुनेने मंचर पोलिसांत फिर्याद दिली. (वार्ताहर)