शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर राहू येथे बलात्कार

By admin | Updated: August 28, 2014 04:17 IST

राहू (ता. दौंड) येथे सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा हा तिचा जवळचा नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे

यवत : राहू (ता. दौंड) येथे सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा हा तिचा जवळचा नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे. यवत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.ही घटना गुरुवार (दि.२१) रोजी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान राहू (ता. दौंड) येथे पीडित मुलीच्या घराजवळ उसाच्या शेतात घडली. याप्रकरणी आरोपी बाबू विश्वनाथ घोलवड याला यवत पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.सदर पीडित मुलीचे आई-वडील ऊसतोडणी कामगार आहेत. गुरुवारी रात्री सगळे झोपलेले असताना मुलगी पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर गेली होती. तेव्हा आरोपीने मुलीला जवळच्या उसाच्या शेतात नेऊन बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी मुलगी अस्वस्थ असल्याने तिच्या आईने तिला राहू येथील खासगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. तेथून मुलीला यवतमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. बलात्काराची घटना असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्याना आल्याने पीडित मुलीला पुणे येथील ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर सदर मुलीवर बलात्कार झाल्याची ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यवत पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली. यवत पोलिसांनी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, जवळचा नातेवाईक असलेला आरोपी बाबू विश्वनाथ घोलवड याने बलात्कार केल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)