शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावची पाणी योजना आजही ठप्प

By admin | Updated: July 29, 2016 03:47 IST

कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी गेल्या दोन महिन्यांपासून संपले असून, यामुळे रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपयांची पाणीपुरवठा

रांजणगाव गणपती : कोंढापुरी  (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी गेल्या दोन महिन्यांपासून संपले असून, यामुळे रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ग्रामस्थांना पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.चासकमानच्या डाव्या कालव्यातून कोंढापुरी तलावात सात दिवसांच्या आत पाणी सोडावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने महिलांच्या उपस्थितीत पुणे-नगर हायवेवर रास्ता रोकोचा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी मानसिंग पाचुंदकर, माजी जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.रांजणगावची स्थायी व अस्थायी मिळून मोठी लोकस्ांख्या असल्याने पाणी प्रश्न बिकट बनला आहे. सद्यस्थितीत तलावातील पाण्याने तळ गाठल्याने २० कोटी रुपये खर्चाची रांजणगावची पाणीपुरवठा योजना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे. कोंढापुरी, रांजणगाव परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकरी सावरला नाही. रांजणगाव गणपतीसह परिसरातील गणेगाव, वरुडे, पिंपरी दुमाला, वाघाळे, बुरुंजवाडी, मोराची चिंचोली, खंडाळे या ७ ते ८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोंढापुरी तलावावर अवलंबून आहे. हा तलाव पाण्याअभावी अजूनही कोरडाठाक पडला आहे. आजही रांजणगावसह परिसरातील या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चासकमानमधून पाणी सोडताना प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे अपेक्षित असताना पाणी सध्या चासकमानमधून शिरूरसाठी थेट टेल पाणी सोडण्यात आले आहे. पाणी शेतीसाठी सोडल्याने रांजणगावसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधांतरी राहिल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले.