शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावला सुरक्षा कडक

By admin | Updated: December 25, 2014 23:20 IST

येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री महागणपती मंदिरातील सुरक्षा मॉकड्रीलनंतर कडक करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर कसून तपासणी करण्यात येत आहे

रांजणगाव गणपती : येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री महागणपती मंदिरातील सुरक्षा मॉकड्रीलनंतर कडक करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर कसून तपासणी करण्यात येत आहे. चाचणीत आढळलेल्या त्रुटींनंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी येथे लक्ष घातले आहे. सुरक्षेचा भाग म्हणून या तपासण्या करण्यात येत असून, भाविकानी भीती न बाळगता गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अंकु श लवांडे, मुख्यविश्वस्त अ‍ॅड. मकरंद देव व उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले. सध्या नाताळच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून, सुरक्षेबाबत भाविकांची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी विश्वस्त मंडळाने ही पत्रकार परिषद घेतली. दहशदवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाची शहरे व धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दहशदवादविरोधी पथकाकडून रांजणगाव गणपती मंदिरात बॉम्बसदृश वस्तू ठेवून मॉकड्रील करण्यात आले होते. त्यात सुरक्षा यंत्रणेत काही त्रुटी आढळल्या होत्या. देवस्थानकडे सध्या सुरक्षेच्या दृष्टीने ३ डोअर मेटल डिटेक्टर, ३ हॅण्ड डिटेक्टर, ३८ सीसीटीव्ही कॅमेरे, १० वॉकीटॉकी यंत्र, ६ फायर एक्स्टीग्युंर, १ अलार्म सिस्टिम कार्यान्वित आहे. एकूण ४० सुरक्षारक्षक, ४ बंदूकधारी सुरक्षारक्षक, २ बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहे. एकाच प्रवेशद्वारातून कडक तपासणी करण्यात येत असून, देवस्थानची सुरक्षा यंत्रणा भाविकांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाली आहे. साध्या वेषातील सुरक्षारक्षक व पोलीस मंदिर व परिसरात बारकाईने नजर ठेवून आहेत. प्रत्येक नागरिकाने व भाविकांनीही सजग राहून कुठेही काही संशयित वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी केले आहे. (वार्ताहर)