शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मतदार राजासाठी रांगोळीच्या पायघड्या

By admin | Updated: February 22, 2017 02:27 IST

दारासमोर रांगोळी... दारावर केळीचे खुंट... कानावर सुमधुर सनईचे सूर... मंद सुगंधाचा दरवळ... फुलांनी होणारे

बारामती : दारासमोर रांगोळी... दारावर केळीचे खुंट... कानावर सुमधुर सनईचे सूर... मंद सुगंधाचा दरवळ... फुलांनी होणारे स्वागत... गुलाबी रंगाच्या पताका...फुगे... गुलाबी रंगाच्या पोशाखातील हसतमुख कर्मचारी... एखाद्या लग्नघरात शोभेल अशा वातावरणात आज सुपे आणि काटेवाडीच्या मतदान केंद्रांवर करण्यात आले होते. उत्साही वातावरणात मतदारांनी मतदान केले. आदर्श मतदान केंद्र साकारताना प्रशासनाने केलेल्या अनोख्या उपक्रमामुळे मतदार अक्षरश: भारावून गेले.जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती तालुक्यात २० आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामधील सुपे मतदान केंद्र ‘पोपटी’, तर काटेवाडी मतदान केंद्र ‘गुलाबी’ रंगाच्या थीमनुसार मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी विशेष रंगसंगतीने सजविण्यात आले होते.18 आदर्श  केंद्रे...सुपे आणि काटेवाडी या दोन्ही मतदान केंद्रांसह तालुक्यातील इतर १८ मतदार केंद्रेही ‘आदर्श मतदार केंद्र’ म्हणून स्थापित करण्यात आली होती. या मतदान केंद्रांचा परिसर स्वच्छ ठेवण्यात आला होता. सुपे आणि काटेवाडी मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र करण्याचे नियोजन चर्चेचा विषय ठरला. मतदारांना आकर्षित करण्याचा हा वेगळा प्रयोग ठरला. केंद्रावर आल्हाददायक वातावरण या दोन्ही मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्षासह मतदान केंद्र अधिकारी १ ते ४ महिलाच होत्या. तसेच, मदतनीस शिपाई व पोलीसही महिलाच होत्या. महिला पोलीस वगळता सर्व कर्मचारी केंद्राने निवडलेल्या रंगसंगतीचा पोशाख परिधान केलेल्या होत्या. तसेच, मतदान केंद्रांसाठी निवडलेल्या रंगाच्या पताका, फुगे लावण्यात आले होते. त्याचबरोबर या दोन्ही मतदान केंद्रांच्या आवारात मधुर संगीताची व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आदी सुविधा होत्या. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रोपटे...जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या वेगळ्या उपक्रमासाठी प्रेरित केले होते. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी आलेल्या पहिल्या पाच मतदारांचे स्वागत रोप देऊन करण्यात आले. या मतदान केंद्राला मुख्य निवडणूक निरीक्षक अरुण डोंगरे यांनीही भेट दिली.