शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस व संघर्ष समितीत रंगला वाद

By admin | Updated: February 16, 2016 01:30 IST

वाळू वाहतुकीच्या ट्रकवर यवत पोलिसांनी कारवाई केल्याच्या कारणावरून रविवारी (दि. १४) रात्री पोलीस आणि वाळू वाहतूकदार संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात चांगलाच वाद झाला.

यवत : वाळू वाहतुकीच्या ट्रकवर यवत पोलिसांनी कारवाई केल्याच्या कारणावरून रविवारी (दि. १४) रात्री पोलीस आणि वाळू वाहतूकदार संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात चांगलाच वाद झाला. पुणे व सोलापूर जिल्हा वाळू वाहतूकदार संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी यवत पोलीस व वाळू वाहतूकदार यांच्यात विविध आरोप-प्रत्यारोप घडत रात्रभर वाद सुरू होता.या वेळी यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व संघर्ष समितीचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यात शाब्दिक चकमकदेखील झाली. शशिकांत चव्हाण यांनी बेकायदेशीरपणे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे. यात पोलिसांवर दबाव टाकून कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास धडक कारवाई करण्याचा इशारा दिला.यानंतर वाळू वाहतूकदार संघर्ष समितीचे प्रमुख भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांची कारवाई हेतूपुरस्पर असल्याचे सांगत विविध पोलिसांवर विविध आरोप केले. आंधळकर यांनी सांगितले, की प्रशासनाला जाग आणण्यासाठी १ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान वाळू वाहतूकदार यांनी संप केला होता. काही आश्वासन मिळाल्याने एकच दिवसापूर्वी संप संपला होता. मात्र रविवारी रात्री यवत पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी भोईटे व गायकवाड यांनी वाळू वाहतुकीचा ट्रक झिरो पोलिसांच्यामार्फत अडवून पैशांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्याने ट्रक पोलीस स्टेशनमध्ये आणला. याची माहिती समजताच वाळू वाहतूकदार संघटनेचे कार्यकर्ते यवत पोलीस स्टेशनमध्ये आले असता. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी अरेरावीची भाषा वापरून कारवाईचे समर्थन केले.(वार्ताहर)बेकायदेशीर धंदे करून दहशत करण्याचा प्रयत्न : शशिकांत चव्हाणरविवारी रात्री वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाकडे कसलीही शासकीय पावती नव्हती. यामुळे पोलिसांनी कारवाई केली. मात्र, वाळू वाहतूक कायदेशीर केल्यास पोलीस कारवाई कशाला करतील. बेकायदेशीर धंदे करून वर दहशत करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे, असे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.