शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘तन्वीर सन्माना’त रंगकर्मींची मांदियाळी

By admin | Updated: December 10, 2015 01:34 IST

नाट्य, चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी, अ‍ॅलेक पदमसी यांनी ‘द मर्चंट आॅफ व्हेनिस’मधील शायलॉकच्या भूमिकेतील सादर केलेला प्रवेश, सहकारी रंगकर्मींनी

पुणे : नाट्य, चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी, अ‍ॅलेक पदमसी यांनी ‘द मर्चंट आॅफ व्हेनिस’मधील शायलॉकच्या भूमिकेतील सादर केलेला प्रवेश, सहकारी रंगकर्मींनी पुरस्कारार्थींचा उलगडलेला मनोगतातून जीवनपट आणि ‘जिजस क्रायसेस-२’मधील चित्रफितीद्वारे दाखविण्यात आलेला रोमांचक प्रसंग अशा वातावरणात तन्वीर सोहळा बुधवारी सायंकाळी रंगला.रूपवेध प्रतिष्ठानतर्फे या वर्षीचा तन्वीर सन्मान ज्येष्ठ नाट्यकर्मी अ‍ॅलेक पदमसी यांना, तर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार कलादिग्दर्शक प्रदीप मुळ्ये यांना ज्येष्ठ अभिनेते आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते देण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा झाला. अभिनेते, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, फारुक मेहता, दीपा लागू व्यासपीठावर होते. मान्यवरांमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता, नाटककार सतीश आळेकर, महेश मांजरेकर, अमोल पालेकर, अतुल पेठे, ज्योती सुभाष आदींची उपस्थिती होती. फारुक मेहता यांनी अ‍ॅलेक पदमसी यांचा नाट्यसृष्टीतील जीवनपट उलगडून दाखविला. वयाच्या सातव्या वर्षी ‘मर्चंट आॅफ व्हेनिस’ या नाटकातील ब्लॅकमूनपासून सुरुवात केली. मुंबईच्या इंग्रजी नाट्यवर्तुळात ‘टेमिंग आॅफ द श्रू’पासून सुरुवात करून ‘शायद आप भी हॅँसे’ या नाटकापासून हिंदी नाट्यसृष्टीत प्रवास सुरू केला. पर्ल पदमसी, कबीर बेदी, सबीरा मर्चंट, शॅरॉन प्रभाकर, दुलिप ताहिल यांसारख्या कलाकारांची तारेतारका होण्याकडे वाटचाल अ‍ॅलेक यांच्या नाटकापासून सुरू झाली. त्यांच्या दिग्दर्शनाखाली स्मिता पाटीलने रंगमंचावर पाऊल ठेवले. शेक्सपिअर, आॅर्थर मिलर, टेनेसी विल्यम्स अशा प्रमुख विदेशी कलाकारांसह प्रताप शर्मा, रिफत शमीम, इस्मत चुगताई, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड अशा भारतीय लेखकांची नाटके त्यांनी इंग्रजी, हिंदी व हिंगलीशमध्ये रंगमंचावर आणली.चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रदीप मुळ्ये यांच्या नेपथ्य, कलाक्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेतला. मुळ्ये यांनी त्यांच्या कारकिर्दीत नेपथ्य आणि प्रकाशयोजनेतील कामगिरीमुळे दृष्यमानतेचे नवे नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. प्रयोगशील आणि व्यावसायिक अशा दोन्ही तत्त्वांवर उत्तमच काम करणारा हा कलाकार आविष्कारच्या माध्यमातून प्रयोगशील दिग्दर्शक म्हणूनही भावला आहे.प्रतिष्ठानविषयी आनंद लागू यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)