मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. त्याचा राज्यभरात निषेध होत असून ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. या वक्तव्यामुळे हवेलीतील शिवसैनिकांसमवेत युवासैनिकही संतप्त झाले आहेत. युवासेना तालुका हवेली यांच्यावतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी आमच्या शिवसैनिकांच्या व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना देण्यात आले. या वेळी युवासेना तालुका उपप्रमुख श्रेयस वलठे पाटील यांच्या पदाधिकारी विकास पवार, प्रसाद ननावरे, तेजस घुसाळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
हवेली तालुका युवासेनेच्या वतीने राणे यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:14 IST