शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बालाजीनगरातील दारूमुक्तीसाठी रणरागिणींचा एल्गार

By admin | Updated: January 9, 2016 01:31 IST

भोसरीजवळच्या बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात एका परवानाधारक देशी दारू दुकानासह बेकायदा दारूविक्रीचे १५ गुत्ते आहेत

पिंपरी : भोसरीजवळच्या बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात एका परवानाधारक देशी दारू दुकानासह बेकायदा दारूविक्रीचे १५ गुत्ते आहेत. झोपडपट्टीत दारूचा महापूर असल्याने व्यसनापायी अनेक कुटुंबे उद््ध्वस्त झाली आहेत. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणूनदेखील दखल घेतली जात नाही. अवैध धंद्यांवर कारवाई होत नाही. बालाजीनगरचा परिसर दारुमुक्त करण्यासाठी एकत्रित आवाज उठविण्यासाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. बेकायदा दारु गुत्त्यावर येऊन कारवाईविना हप्ते घेणा-या पोलिसांना विरोध करण्याचा निर्धार रणरागिनींनी केला आहे. व्यसनाधीनतेमुळे आजार होऊन अनेक जण दगावले. पतीच्या जाचाला कंटाळून काही महिलांनी आत्महत्या केल्या. घटस्फोटाने कुटुंबं विभक्त झाली. व्यसनांच्या आहारी गेलेल्यांनी घरातील साहित्य विकले. मुलांची आबाळ झाली... रोज भांडण, शिवीगाळ हे झोपडपट्टीत नित्याचेच झाले आहे. या अगतिक भावना व्यक्त करून भोसरी, बालाजीनगर परिसरातील दारूधंदे कायमचे बंद करण्यासाठी दारूमुक्ती महिला समितीच्या माध्यमातून १५०० महिलांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. पोलिसांना निवेदन दिले. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे वस्तुस्थिती विशद केली आहे. अगोदर सनदशीर व लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करतात. त्याबद्दल सर्वत्र चर्चा होते. झोपडपट्टीत दारूच्या व्यसनापायी कित्येक कुटुंबं उद््ध्वस्त होतात. त्याकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून झोपडपट्टी परिसरातील बेकायदा दारूधंदे बंद करण्याची आग्रही मागणी महिलांनी केली आहे. दारूमुक्ती महिला समितीतर्फे सनदशीर मार्ग अवलंबून पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणे निवेदने दिली. शिष्टमंडळाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटी घेऊन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. एवढे सर्व करून काही मार्ग न निघाल्यास दारूबंदी मोहीम अधिक तीव्र करून दारूबंदीसाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार केला.(प्रतिनिधी)