शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रमेश थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:13 IST

शिक्रापूर: येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांची निवड करण्यात आली. सुभाष खैरे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही ...

शिक्रापूर: येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांची निवड करण्यात आली. सुभाष खैरे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

शिरूर तालुक्यातील राजकीय डावपेचात अग्रेसर असलेल्या शिक्रापूर येथील या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद एका गटाकडे, तर उपसरपंचपद दुसऱ्या गटाकडे अशी सध्याची परिस्थिती असून, नुकत्याच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मांढरे, करंजे, जकाते गटाने उपसरपंच पद आपल्याकडे राखले आहे. शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे विकास यांच्या उपस्थित उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच रमेश गडदे, सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे ,वंदना भुजबळ, सारीका सासवडे,मोहिनी मांढरे , कृष्णा सासवडे, मोहिनी संतोष मांढरे, शालन राऊत, त्रिनयन कळमकर, पूजा भुजबळ, प्रकाश वाबळे ,कविता टेमगिरे ,उषा राऊत ,विशाल खरपुडे ,रमेश थोरात, सीमा लांडे, आदी सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपसरपंच पदासाठीच्या निवडणुकीमध्ये रमेश थोरात, त्रिनयन कळमकर, मोहिनी मांढरे व उषा राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, मोहिनी मांढरे व उषा राऊत यानी अर्ज मागे घेतला. त्रिनयन कळमकर व रमेश थोरात यांच्यात निवडणूक घेण्यात आली. या वेळी रमेश थोरात यांना नऊ मते, तर त्रिनयन कळमकर यांना आठ मते मिळाली, त्यामुळे रमेश थोरात यांची उपसरपंचपदी निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी जाहीर केले.

निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुम मांढरे,माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते ,सोमनाथ भुजबळ, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक अरुण करंजे ,माजी ग्रामपंचायत सदस्य गौरव करंजे, नीलेश थोरात,रमेश भुजबळ ,संतोष मांढरे, आदींच्या हस्ते उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

१९ शिक्रापूर ग्रामपंचापयत

निवडीनंतर रमेश थोरात यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.