शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

‘रमजान’मध्ये गरजूंचा आधार व्हावे

By admin | Updated: May 29, 2017 01:37 IST

इंडोनेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात ‘रमजान’च्या महिन्यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, गरजूंना समुपदेशन व मानसिक

इंडोनेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात ‘रमजान’च्या महिन्यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, गरजूंना समुपदेशन व मानसिक आधार देणे हे शक्य होत असेल; तर मग आपल्या देशात का होऊ नये? असा सवाल इस्लाम धर्माचे अभ्यासक अस्लम जमादार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना उपस्थित केला. तसेच आपल्या शेजारील कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती भुकेली राहणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येक मुस्लिम बांधव त्याच्या मदतीसाठी सरसावेल तेव्हा खऱ्या अर्थाने ‘रमजान’ साजरा होईल, असे त्यांनी नमूद केले.मुस्लिमांच्या पवित्र ‘रमजान’ महिन्याला रविवारी सुरुवात झाली आहे. रमजान म्हणजे उपासना, कृतज्ञता, आनंद आणि आभार प्रदर्शनाचाच महिना म्हणून गणला जातो, असे नमूद करून जमादार म्हणाले, इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती, शुद्धता, समर्पण व आज्ञापालन असा आहे. इस्लाम म्हणजे मानवाचे ईश्वराला आत्मसमर्पण व ईश्वराची आज्ञापालन होय. जो कोणी जीवनाच्या प्रत्येक पैलूचे इस्लामच्या शिकवणुकीनुसार पालन करील तोच खरा ‘मुस्लिम’ आहे.जमादार म्हणाले, ‘रमजान’ महिन्यात पवित्र ग्रंथ कुराण उतरविण्याचे व आदेशांना ग्रथित करण्याचे काम झाले आहे. म्हणूनच या महिन्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. तसेच ईश्वराचे नामस्मरण करावे आणि उपवास (रोजा) संपूर्ण महिनाभर करण्यात मुस्लिम बांधव तल्लीन होऊन जातात.रोजा म्हणजे केवळ उपाशी राहून चालत नाही. या संबंधी प्रेषित मुहम्मद पैगंबर (स.) यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. डोळ्याचा रोजा, हाताचा रोजा, पायांचा रोजा, कानाचा रोजा आहे. रोजा ठेवणाऱ्या डोळ्यांनी वाईट पाहू नये. हाताने वाईट काही करू नये, त्याची पाऊले वाईट मार्गाकडे वळू नयेत, कानांनी वाईट काही ऐकू नये. कोणाशी भांडू नये. कोणी भांडायला आल्यास त्यांना नम्रपणे सांगावे की मी रोजात आहे. या एक महिन्याची पवित्र जीवनपद्धती रोजा ठेवणाऱ्या व्यक्तीस एवढी आत्मीक शक्ती प्रदान करते, की समाजासाठी ती व्यक्ती उपयोगी होऊन जाते. रोजाच्या माध्यमातून आदर्श व्यक्तीची निर्मिती व्हावी, त्यातून एक आदर्श समाजाची रचना होईल; हाच त्यामागील उद्देश दिसून येतो. परंतु, दुर्दैवाने असभ्यतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. खोटेपणा, विश्वासघात, फसवणूक ही मोठ्या स्तरावर पोहोचू लागली आहे. अहंकार, लोभीपणा, स्वार्थ, यांनी थैमान मांडले आहे.मुस्लिम समाजातील व्यक्तीने सत्य, चांगुलपणाची नीतिमूल्ये आचरणात आणताना कुराणचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज आहे.‘रमजान’ म्हणजे भल्या पहाटे उठणे, जेवणे, इफ्तार पार्टीच्या माध्यमातून अन्नपदार्थ खाणे असे बहुतेकांचे समीकरण होऊ लागले आहे. मुस्लिम समाजातील धार्मिक संस्थेतील, मदरसे, मशिदीमधून मुल्ला-मौलवी सातत्याने आपल्या प्रवचनाताून प्रबोधन करत असले तरी शेजारील गरीब, गरजू निराधार पीडितांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक, मानसिक मदत करण्यात मोठे यश मिळालेले नाही.‘जकात’ ही संकल्पना खरे तर गरीब आणि श्रीमंती यांच्यातील दरी दूर करण्यासाठी निर्मित केली गेली, असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजातील विचारवंत, अभ्यासक, धार्मिक नेत्यांनी एकत्र येऊन ही सकंल्पना युवा पिढीला हाताशी घेऊन कार्यान्वित केली तर आर्थिक मदतच नव्हे तर रोजगारसुद्धा उपलब्ध होऊ शकेल. काही मशिदींच्या समोर बुरखेधारी घटस्फोटित, विधवा महिला आपल्या लेकरांना बरोबर घेऊन मदतीच्या अपेक्षेने उभ्या असतात. ही स्थिती बदलून या महिला  स्वत:च्या पायावर उभ्या राहण्याची गरज आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.‘ईद’च्या दिवशी व संपूर्ण रमजान महिन्यात इतर जातीधर्मातील किमान पाच व्यक्तींशी मैत्रीनाते संबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी  स्नेह प्रस्थापित करणे हाच अलीकडील काळातील ‘रमजान’चा संदेश आहे, असे म्हटल्यास  चुकीचे ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.