शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खडक पोलिसांनी जपली माणुसकी

By admin | Updated: November 24, 2015 01:04 IST

खाकी वर्दीमध्ये माणूसच काम करीत असतो; त्यालाही भावना आणि संवेदना असतात, याचा प्रत्यय खडक पोलिसांच्या उपक्रमामधून आला असून, खडक

पुणे : खाकी वर्दीमध्ये माणूसच काम करीत असतो; त्यालाही भावना आणि संवेदना असतात, याचा प्रत्यय खडक पोलिसांच्या उपक्रमामधून आला असून, खडक पोलिसांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी तब्बल १0 हजार किलो धान्याची मदत केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते हस्ते नारळ फोडून हा ट्रक मराठवाड्याकडे रवाना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली. या कामामध्ये पोलिसांना सेवा मित्र मंडळाची मोठी मदत झाली. खडक पोलीस ठाणे आणि सेवा मित्र मंडळाने गणेशोत्सवापासून आजवर दुष्काळग्रस्त भागासाठी तीन ट्रक धान्य पाठवले आहे. शनिवारी यातील तिसरा ट्रक अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे, उपायुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी, भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव उपस्थित होते. सेवा मित्र मंडळासोबतच खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश आणि नवरात्र मंडळांना एकत्र करण्यात आले. राज्यात पडलेल्या दुष्काळाचे आव्हान पेलण्यासाठी एकत्र येण्याच्या पोलिसांनी केलेल्या आवाहनाला आवाहनाला मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. मंडळांनी देखावे आणि विसर्जन मिरवणुका रद्द केल्या, तसेच शाळकरी मुलांनी खाऊसाठीचे पैसे जमवून मदतीसाठी दिले.यापूर्वी सोलापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव या भागात मदत पाठवण्यात आली होती. दुष्काळग्रस्तांची दिवाळी चांगली जावी, यासाठी दिवाळी सरंजामही पाठवण्यात आला होता. मोलमजुरी करणाऱ्या शेतमजुरांना ४५0 दिवाळी किट भेट देण्यात आले होते. यामध्ये दिवाळीसाठी लागणारे ९ पदार्थ पुरेशा प्रमाणात देण्यात आले होते. यापुढेही दुष्काळग्रस्तांसाठी अशा प्रकारे मदत गोळा करण्यात येणार असून, इच्छुकांनी खडक पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी केले आहे.