शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राजगुरुनगरकर तापले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:33 IST

शहर व परिसरात डेंगीची व चिकुनगुनियाची साथ पसरली आहे.

राजगुरुनगर : शहर व परिसरात डेंगीची व चिकुनगुनियाची साथ पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ४०० नागरिकांना डेंगीची लागण झाली आहे. रोज नवीन डेंगीचे रुग्ण सापडत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील कचरा योग्य पद्धतीने उचलला जात नाही. तसेच, सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रोगराई पसरत आहे. नगर परिषद व आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पावसाळा सुरूअसून शहरातील विविध भागांमध्ये अद्यापही औषध फवारणी, धुरळणी करण्यात आलेली नाही. तसेच, रस्त्यात अनेक ठिकाणी कचºयाचे ढीगही दिसत आहेत. पाण्याची साचलेली डबकी यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे. सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.राजगुरुनगर शहरात राक्षेवाडी, पाबळ रोड, पडाळवाडी तसेच ग्रामीण भागातही या डेंगीचे रुग्ण आढळत आहे. नगर परिषद तसेच आरोग्य खाते त्यांना याबाबत सोयरसूतक नसल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी गटारे उघडी असून पाण्याची डबकी साचली आहे. यावर कुठलीही उपाययोजना होत नाही.गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात दररोज लहान मुले, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा १० जणांना डेंगी व चिकुनगुणियाची लागण झाली असल्याचे निदान होत आहे. शहरातील खासगी दवाखान्यात डेंगीचे रुग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसांत ४०० हून अधिक रुग्णांना डेंगीची लागण झाली असल्याचे डॉक्टर एम. बी. भुजबळ, डॉ. दिलीप बाबळे, डॉ. खडके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.डेंगीचे डास स्वच्छ पाण्यात होतात, घरांमध्ये राहतात व दिवसा चावतात. शाळेत, आॅफिस इत्यादी ठिकाणी डास चावत असतील तर तिथे डासांचा बंदोबस्त करायला हवा.काळजी म्हणून घरातील कुंड्या, फ्रीजच्या खालील ट्रे, फुलदाणी, एअर-कंडिशनर, तसेच उघड्यावरील टायर, फुटके डबे, कौले, करवंटी, गच्चीवर पाणी साठण्याच्या जागा, झाकण उघडे राहिलेल्या पाण्याच्या टाक्या इत्यादीत पाणी साठल्यास तिथे डेंगीचे डास होतात.>डेंगीचे डास घरात, घराभोवती होतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त नागरिकांनीच करायला हवा. सर्व डॉक्टर्सनी डेंगीच्या रुग्णांबाबत नगर परिषदेला कळवले पाहिजे. म्हणजे डेंगी झालेल्यांच्या व त्यांच्या शेजारच्यांच्या घरात, डासनाशकाची फवारणी करणे गरजचे असल्याचे पाबळ रोड येथील डॉक्टर महेश टाकळकर यांनी सांगितले.