शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राजगुरुनगरला महामार्ग केला मोकळा, प्रांताधिका-यांची धडाकेबाज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:41 IST

राजगुरुनगर : पुणे-नाशिक या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी (दि.२६) धडक कारवाई करण्यात आली.

राजगुरुनगर : पुणे-नाशिक या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी (दि.२६) धडक कारवाई करण्यात आली. नगर परिषद, महसूल व पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबवून अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमणे काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.राजगुरुनगर शहरात पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले होते. यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणे हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक, प्रवाशी करीत होते. अतिक्रमणे, अरुंद पूल यामुळे नेहमीच वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे राजगुरुनगरमधून प्रवास म्हणजे नको रे बाबा! अशीच भावना झाली होती.गुरुवारी सकाळी सहापासूनच प्रशासनाने उपविभागीय अधिकारी तथा प्रांत आयुष प्रसाद यांच्या नेत्तृत्वाखाली धडक मोहीम राबविण्यात आली. महामार्गावरील खेड पोलीस स्टेशन ते थिगळस्थळपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढून टाकले. तसेच पाबळ चौकातील अतिक्रमणेहीहटवविण्यात आली. यामध्ये पत्राचे शेड, दुकानांचे लावलेले जाहिरातींचे फलक, हातगाड्या, पानटपºया, वडापावच्या हातगाड्या जेसीबी यंत्राद्वारे काढून टाकल्या. ही कारवाई नगर परिषदेच्या आदेशान्वये केली. अतिक्रमण करणाºयांना दोन दिवसांपूर्वीच नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच गावात भोंगारिक्षा फिरवून दवंडीही देण्यात आली होती. स्वत: अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले होते. अतिक्रमणांमुळे बसस्थानकाहून महामार्गावर येत असताना डावीकडून येणारे वाहन दिसत नव्हते. त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. या कारवाईमुळे एसटी बसस्थानकात लगत असलेले हुतात्मा राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे लांबून दिसू लागले आहेत. पाबळ चौकातील एसटी बसस्थानकांची सुरक्षा भिंतही दिसू लागली आहे. हा रस्ता आता कुठे मोकळा श्वास घेत आहे. चहाटपरी, पानटपरी, वडापाव, फळविक्रते या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे.आज सकाळपासूनच ३० ते ३५ अतिक्रमणे हटविण्यात आली. दिवसभर कारवाई सुरू होती.यावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, तहसीलदार सुनील जोशी, नायब तहसीलदार राजेश कानसकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता भास्कर क्षीरसागर यांच्यासह या कारवाईत ६ वरिष्ठ अधिकारी, ६० पोलीस कर्मचारी, दोन दंगाकाबू पथके, नगर परिषद कर्मचारी सहभागी झाले होते.उदरनिवार्हाचा प्रश्न, पर्यायी व्यवस्था कराप्रशासनाने तर अतिक्रमणे हटवली. त्यामुळे शहरातील शेकडो कुटुंबांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामार्गावरील रस्त्यावर विक्री करणारे फळविक्रे ते, पानविक्रेते, चप्पल-बुट विक्रेते, चहाविक्रेते, वडापावविक्रेते आणि इतर अनेक छोटे-छोटे व्यवसायीक रस्त्यावर आले आहे. रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण काढले असले तरी अतिक्रमणधारकांना नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रीया विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. १५ दिवसांपूर्वी आयुष प्रसाद यांनी खेड विभाग येथे उपविभागीय पदावर रुजू झाले आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी कामाचा धडाका सुरू केला असल्यामुळे तालुक्याला एक तरुण,खमका, निर्भीड, ‘सिंघम’ अधिकारी मिळाला असल्यामुळे राजगुरुनगर शहरातील नागरिक आयुष प्रसाद यांचे कौतुक करीत आहेत.पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व अतिक्रमण काढून या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजकटाकून काही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात येणार आहे. रस्ता प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जेणेकरून वाहतूककोंडी होणार नाही, महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांना, पादचारी तसेच शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही. उद्या (दि.२७) वाडा रोडवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे. - आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारीतथा प्रांताधिकारी, खेड विभाग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा