लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरात बुधवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील तीन दुकानांची शटर उचकटून मोबाईल, लॅपटॉप, कपडे असा ६१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडारोड येथील कासवा कॉम्प्लेक्समध्ये (दि.६) रात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी हेंमत सोळसे यांच्या मोबाईल केयर दुकानाचे शटर उचकटून नवीन मोबाईल व इतर मोबाईलच्या वस्तू असे ३२ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी केले. तसेच क्षितिज ढोरे यांच्या मोबाईल शॉपीचे शटर तोडून १२ हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप व मोबाईल असे साहित्य चोरले. तसेच कमलेश खैरे यांच्या साई ब्रँड कपड्याचे दुकानाचे शटर उचकटून १६ हजार किमतीचे कपडे असा एकून ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. शुक्रवारी (दि ७) सकाळी चोरीची हीघटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव, पोलीस हवालदार स्वप्निल गाढवे यांनी पाहणी करून पंचनामा केला. तिन्हेवाडी रोड बच्चेपाटील कॉलनी येथेही ३ मोटारसायकल व घरफोडी झाली आहे.
फोटो ओळ: राजगुरूनगर येथील कासवा कॉम्प्लेक्स येथे चोरट्यांनी तीन दुकानांची शटर उचकटून मोबाईल व कपड्यांची चोरी केली, यांची पाहणी करताना पोलीस निरीक्षक सतीश गुरव.