शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील राजेंद्र नवले शहीद

By admin | Updated: May 8, 2015 05:16 IST

बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील शिवाजी ऊर्फ राजेंद्र बाजीराव नवले (वय ३८) या सैन्यदलातील जवानाला श्रीनगर येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत

बारामती : बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील शिवाजी ऊर्फ राजेंद्र बाजीराव नवले (वय ३८) या सैन्यदलातील जवानाला श्रीनगर येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झाले. नवले यांच्यावर शासकीय इतमामात पाहुणेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नवले यांना वीर मरण प्राप्त झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. नवले हे पाहुणेवाडी दत्तोबानगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांना वीर मरण प्राप्त झाल्याची माहिती त्यांच्या वरिष्ठ कार्यालयातून चुलत भावाला मोबाईलवर गुरूवारी सकाळी देण्यात आली. सायंकाळी पुणे येथे विमानातून नवले यांचे पार्थिव आणण्यात आले. या ठिकाणी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह लष्कराने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांचे पार्थिव लष्कराच्या स्वतंत्र वाहनाने पाहुणेवाडी येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना शोक अनावर झाला होता. यावेळी पाहुणेवाडीसह आसपासच्या गावांमधील सर्व ग्रामस्थ एकत्रित आले. ग्रामस्थ, युवक यांच्या ‘अमर रहे, अमर रहे, वीर जवान शिवाजी नवले अमर रहे,’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवले यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीला शासकीय अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.