शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

डिनर डिप्लोमसीचा ‘राज’योग

By admin | Updated: January 20, 2016 01:30 IST

साहेबांना भेटायचं तर कुणी त्यांच्याशी थेट संपर्क साधूच देत नाही... पुण्यात आले तर ते ठराविक पदाधिकाऱ्यांनाच वेळ देतात..

पुणे : साहेबांना भेटायचं तर कुणी त्यांच्याशी थेट संपर्क साधूच देत नाही... पुण्यात आले तर ते ठराविक पदाधिकाऱ्यांनाच वेळ देतात.. आमच्या तक्रारी असूनही त्यांच्याकडे लक्ष द्यायला साहेबांना वेळच नाही. त्यामुळे पक्षात राहून काय करणार, असे जाहीरपणे बोलत मनसेचा झेंडा खांद्यावरून उतरवून भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्याच्या तयारीत असलेल्या मनसेच्या नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतची आगळीवेगळी डिनर डिप्लोमसी रोखणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महापालिकेच्या निवडणुका अवघ्या वर्षभरावर आल्या आहेत. या निवडणुकीसाठी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मागील आठवड्यात ठाकरे यांनी पुण्यात प्रमुख पदा़धिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात काही शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ताही केल्या आहेत. २0११ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळून २00७ मध्ये दहाच्या आत असलेल्या मनसेच्या नगरसेवकांची संख्या २८ वर पोहोचली होती. मात्र, गेल्या चार वर्षांत पक्षाला महापालिकेत तटस्थ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्यातच मागील वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाला चांगलाच धक्का बसल्याने त्याचे पडसाद महापालिका निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत पक्षातील नगरसेवकांमध्ये गटातटाचे राजकारण सुरू असल्याने आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक पदाधिकारी तसेच नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. असे असतानाच मागील आठवड्यात ठाकरे यांनी ५ प्रांत उपाध्यक्ष, २ शहराध्यक्ष, ४ उपशहराध्यक्ष, ७ विभाग अध्यक्ष तसेच चार ते पाच नगरसेवकांसह चक्क अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम ठेवला. यासाठीची जबाबदारी एका नाराज नगरसेवकाकडे देण्यात आली. एरवी दम भरणाऱ्या ठाकरे यांनी चक्क मिस्कील शैलीत गप्पा मारत प्रत्येकाची विचारपूस केली. तर अनेकांची मस्करीही केली. त्यामुळे ठाकरे यांच्या या आगळ्यावेगळ्या भेटीने हे पदाधिकारी भारावून गेले होते. या वेळी या हॉटेलात आलेल्या अनेकांना ठाकरे यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनाही आपल्या खास ठाकरी शैलीत मिस्कील कोपरखळ्या मारत ठाकरे यांनी त्यांच्यासमवेत फोटो काढले.