शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे साधणार विधानसभानिहाय संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मागील चार वर्षात आलेली मरगळ ...

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मागील चार वर्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मनसेच्या नव्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याला पुन्हा आणखी तीन दिवस दिले आहेत. या तीन दिवसीय दौऱ्यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत.

मनसेला २०१२ झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये पुणेकरांनी साथ देत तब्बल २९ नगरसेवक निवडून दिले होते. मात्र, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ही संख्या अवघी दोन नगरसेवकांवर आली. पक्षाच्या संघटनात्मक कामातही मोठ्या प्रमाणावर मरगळ आली होती. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली होती. ही गटबाजी विधानसभा निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीमध्येही प्रकर्षाने समोर आली. पक्षाचे नेतृत्वही संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पदाधिकारी खासगीत बोलत होते.

विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला चमकदार कामगिरी करता आली नाही. आता, पालिका निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद आजमावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील बारा ते चौदा महापालिकांच्या संभाव्य निवडणुकांसाठी मनसेने पुन्हा जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आता राज्यभर दौरे करु लागले आहेत. नाशिकचा दौरा संपल्यानंतर ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत.

ठाकरे हे रविवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाल्यानंतर सोमवारी व मंगळवारी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत. तसेच बुधवारी कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या संस्था आणि व्यक्तींशी चर्चा करून त्यांचा सन्मान करणार आहेत. आगामी निवडणूक आणि संघटनात्मक बांधणीविषयी गांभीर्याने चर्चा केली जाणार असल्याचे मनसे नेते राजेंद्र वागसकर व शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

चौकट

राज ठाकरे हे येत्या सोमवारी (दि. १९) सकाळी वडगाव शेरी व शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी कोथरूड व खडकवासला मतदार संघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. मंगळवारी सकाळी हडपसर व कॅन्टोन्मेंट मतदार संघ, तर दुपारी कसबा व पर्वती मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.