शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अखेर पावसाला सुरुवात!

By admin | Updated: June 20, 2016 01:09 IST

दहा दिवसांच्या हुलकावणीनंतर अखेर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरिपांच्या पेरण्यांना सुरवात होणार आहे.

बारामती/इंदापूर : दहा दिवसांच्या हुलकावणीनंतर अखेर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरिपांच्या पेरण्यांना सुरवात होणार आहे. सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने पावसाचे वातावरण तयार झाले होते. बारामती, इंदापूर, पुरंदर, आंबेगाव तालुक्यात हलक्या सरी बरसल्या. सायंकाळनंतर बारामती आणि इंदापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली हवामान खात्यांच्या अंदाजानंतरही पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे पेरण्यासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवार (दि. १९) दुपारपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या यामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिरायती भागातील मोरगाव, तरडोली, आंबी, जोगवडी, मोडवे, मुर्टी या भागात दुपारपासून पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. हा पाऊस खरीप हंगामातील बाजरी, मूग, मटकी, हुलगा, मका, सूर्यफुलाच्या पेरणीसाठी जरी पोषक नसला, तरी पावसाच्या या हलक्या सरींमुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे.बारामती शहर आणि तालुक्यात रविवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी पाच वाजता पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी उशिरापर्यंत आधूनमधून या पावसाच्या सरी पडत होत्या. इंदापूर शहरात दुपारी दोन वाजता दमदार पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या या पावसाने आठवडा बाजाराची त्रेधा उडवली. मात्र, या पावसामुळे सर्वच जण सुखावले गेल्याचे चित्र होते. सकाळपासून आभाळ भरून आले होते. वाहती हवा असल्याने दुपारीच पाऊस येईल, असे कुणाला वाटले नव्हते. पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आभाळात अचानक काळ्या ढगांची दाटी झाली. काही समजण्याच्या आत पाऊस सुरू झाला. रविवारच्या आठवडेबाजाराची त्याने त्रेधा उडवली. भिगवण परिसरातही जवळपास दोन तास पावसाने हजेरी लावली. (वार्ताहर)