पुणे : शहरात सकाळच्या प्रचंड उन्हानंतर अचानक आकाशात ढग भरून आले आणि दुपारी ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. प्रचंड उकाड्यानंतर आलेल्या या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे उकाडा काहीसा कमी झाला. पुढील दोन दिवसही शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आर्द्रता वाढीस लागले होते. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. मंगळवारी रात्रीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी कडक ऊन पडले होते. मात्र बारानंतर हवेत ढग जमू लागले. काही क्षणांतच मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सिंहगड रस्ता, लॉ कॉलेज रस्ता येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ मिमी पावसाची नोंद झाली. तापमानात किंचीत घट होऊन ३७.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दोन दिवसातही आकाश ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
पावसाची हजेरी
By admin | Updated: April 7, 2016 00:57 IST