शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दणका : वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: June 10, 2015 04:39 IST

परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचे खांब कोलमडले. विद्युतवाहक तारा तुटल्या असून, वीजपुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

दावडी : परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचे खांब कोलमडले. विद्युतवाहक तारा तुटल्या असून, वीजपुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पडलेल्या खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.वीज मंडळाकडे तक्रार करूनही अद्याप कुठलीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी दावडीचे माजी सरपंच सुरेश डुंबरे यांनी केली आहे.दावडी परिसरात रविवारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वाऱ्यामुळे विजेचे सिमेंट खांब कोलमडून पडले. विद्युतवाहक तारा तुटल्या. त्यामुळे दिघेवस्ती, आमराळवाडी, डुंबरेवस्ती, गावडेवस्ती या वस्त्यांवरील वीजपुरवठा बंद आहे. वीज नसल्यामुळे घरगुती वीज, पिठाच्या गिरण्या, विद्युत पंप बंद आहेत.कुरकुंभला पावसाचे थैमानकुरकुंभ : येथे रविवार रात्री झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले तब्बल दिड तासात पाणीच पाणी करुन टाकले. दरम्यान या पावसामुळे बऱ्याच घरामध्ये तसेच दुकानात पाणी जमा झाल्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली.रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. क्षणार्धात कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे डोंगर कड्यावरील पाणी मिळेल त्या मार्गाने वेगात घरात घुसले त्यामुळे एकच धावपळ उडाली. दरम्यान दौड -बारामती रोड लगत असणाऱ्या नाल्याला पुराचे स्वरुप आले त्यामुळे येथील छोट्या पुलावरुन पाणी वाहिल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पुणे -सोलापुर महामार्गावर असणारा सेवा रस्ता , कुरकुंभ - पांढरेवाडीला जोडणारा रस्ता यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तसेच महामार्गावरील भराव पुलाचा भराव बऱ्याच ठिकाणी वाहून जात जवळील दुकानात गेला त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले.येथील नाल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे पात्र अगदीच लहान झाले आहे. त्यामध्ये कचऱ्याचे ढीग तसेच झाडे देखील वाढली आहेत.