शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धरणक्षेत्रात रात्री पावसाचा जोर, पवना धरणक्षेत्रात २४ तासांत २८४ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:38 IST

धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (दि. १७) पावसाचा जोर काहीसा ओसरला; मात्र सोमवारी रात्रभर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीपातळीत चांगली वाढ होत आहे.

पुणे : जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (दि. १७) पावसाचा जोर काहीसा ओसरला; मात्र सोमवारी रात्रभर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीपातळीत चांगली वाढ होत आहे. खडकवासला धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यात पवना धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल २८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पवना धरणक्षेत्रात ६१, तर त्या पूर्वीच्या पंधरा तासांत २२३ मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव धरणक्षेत्रात मंगळवारी दिवसभरात टेमघर ६९, वरसगाव ३५, पानशेत ३२ आणि खडकवासला परिसरात ६ मिलिमीटर पाऊस झाला, तर मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघरला १२३, वरसगाव १५५, पानशेत १५१ आणि खडकवासला येथे ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रात्रभर झालेल्या चांगल्या पावसामुळे मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २०.२४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झालाहोता. सोमवारी या धरणांत१८.५८ टीएमसी साठा होता. म्हणजेच, त्यात चोवीस तासांत १.६६ टीएमसीने वाढ झाली.मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे ४, माणिकडोह २, डिंभे १०, कळमोडी ८, चासकमान ६, भामाआसखेड ४, वडिवळे ४५, आंद्रा १७, कासारसाई १०, गुंजवणी ११, नीरा देवघर १७ आणि भाटघरला १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली; मात्र मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पिंपळगाव जोगे ३६, माणिकडोह ५६, येडगाव ५१, वडज २८, डिंभे ६७, कळमोडी १०५, चासकमान ७२, भामाआसखेड २६, वडिवळे १०८, आंद्रा ५५, कासारसाई ६८, मुळशी १७२, गुंजवणी ९३, नीरा देवघर १०५, भाटघर ४९, वीर ३२, नाझरे २६ आणि उजनीला १४ मिलिमीटर पाऊस झाला.खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने मंगळवारी सकाळी धरणातून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सायंकाळी पाचपर्यंत पाण्याचा विसर्ग ४ हजार ७०८ क्युसेक्सपर्यंत खाली आणण्यात आला. कळमोडी धरण भरल्याने त्यातून १ हजार २७० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यातून पाणी विसर्ग होत असल्याने उजनीतील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.>धरणाचे नाव पाणीपातळी टक्केवारी(टीएमसीमध्ये)कळमोडी १.५१ १००चासकमान ६.०६ ८०.०६भामा आसखेड ५.०२ ६५.५१आंद्रा २.५१ ८५.८९पवना ६.६४ ७८.०८मुळशी १३.४७ ७२.९८टेमघर २.०८ ५५.९८वरसगाव ७.२२ ५६.३३पानशेत ८.९७ ८४.२०खडकवासला १.९७ १००गुंजवणी २.३७ ६४.३५नीरा देवघर ६.६० ५६.३२भाटघर १४.१३ ६०.१४