शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांच्या तक्रारींंचा पाऊस, महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:20 IST

सिंहगड रोडला राजाराम पुलाच्या येथे मोठा खड्डा पडला... विठ्ठलवाडी येथे ड्रेनेजचे झाकण तुटले असून, मोठा अपघात होऊ शकतो.

पुणे : सिंहगड रोडला राजाराम पुलाच्या येथे मोठा खड्डा पडला... विठ्ठलवाडी येथे ड्रेनेजचे झाकण तुटले असून, मोठा अपघात होऊ शकतो.... धायरीत रस्त्याला प्रचंड खड्डे पडले असून, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांस सर्वांनाच प्रचंड अडचण निर्माण होतेय... अशा अनेक तक्रारी करणारे फोन महापालिकेत बुधवारी दिवसभर खणखणत होते. तक्रार आल्यानंतर तातडीने महापालिकेच्या पथ विभागाकडून दखल घेऊन खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी ‘रोड मेंटेनन्स व्हॅन’ पोहोचते. बुधवारी दिवसभरात महापालिकेकडे ५५ तक्रारी आल्या. यापैकी ४० ठिकाणी दुरुस्तीदेखील करण्यात आली.शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. यामध्ये उपनगरासह मध्यवस्तीमध्ये तर रस्त्यांची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. शहरात झालेल्या पहिल्याच पावसानंतर रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या कारभाराचे पितळच उघडे पडले आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतदेखील शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत जोरदार चर्चा झाली. पावसामुळे रस्त्यांना पडलेले खड्डे, शहराच्या विविध भागात सुरू असलेले मेट्रोचे काम, महापालिकेच्यावतीने भरपावसात सुरू असलेली फुटपाथ व सिमेंट रस्त्यांची कामे यामुळे होणारी वाहतूककोंडी यामुळे गेल्या काही दिवसांतच पुणेकर हैराण झाले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी खास टेलिफोन क्रमांक देण्यात आला. त्यानुसार बुधवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत महापालिकेला ५२ ते ५५ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये तक्रारी आल्यानंतर पथ विभागाच्या कर्मचाºयांमार्फत तातडीने खड्डे बुजविण्यात येत आहेत.>खड्डे बुजविण्यासाठी खास ‘कोल्डमिक्स’चा वापरखड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून आतापर्यंत हॉटमिक्स (गरम डांबरमिश्रित खडी) वापरले जात होते.परंतु पावसाळ््यामध्ये ओल्या खड्ड्यांमध्ये ही डांबरमिश्रित खडी घट्ट बसत नसल्याने खास नवीन तंत्रज्ञान ‘कोल्डमिक्स’चा वापर सुरू करण्यात आला.यामुळे पावसाने उघडीप दिल्यानंतर त्वरित खड्डेदुरुस्ती करणे शक्य होऊ लागले आहे.महापालिकेच्या पथ विभागाच्यावतीने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यामध्ये नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवर २४ तासांच्या आत दखल घेऊन दुरुस्ती केली जात आहे. याशिवाय शहराच्या प्रत्येक भागातील रस्त्यांचे नियोजन करून खड्डे बुजवणे, ड्रेनेजची तुटलेली झाकणे दुरुस्त करणे आदी सर्व प्रकारची कामे करण्यासाठी महापालिकेच्यावतीने स्वतंत्र यंत्रणाच कामाला लावली आहे.- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख