शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या आठवड्याहून अधिक काळ कोकणाला झोडपून काढणा-या पावसाचा राज्यातील जोर आता कमी झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या आठवड्याहून अधिक काळ कोकणाला झोडपून काढणा-या पावसाचा राज्यातील जोर आता कमी झाला आहे. पुढील दोन दिवस राज्यात कोठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने कोठेही अलटे दिलेला नाही. विदर्भात काही जिल्ह्यात २३ व २४ जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

रविवार सकाळपर्यंत कोकणातील पेडणे १९०, माथेरान १२०, सावंतवाडी १००, दोडामार्ग, मंडणगड ९०, केपे, सुधागड, पाली, वैभववाडी, वाल्पोई ८० मिमी पावसाची नोंद झाली होती. या शिवाय सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा ११०, चांदगड, लोणावळा, महाबळेश्वर ९०, राधानगरी, त्र्यंबकेश्वर ६०, आजारा, गारगोटी, हर्सूल, पन्हाळा, शाहूवाडी ५०, वडगाव मावळ ४० मिमी पाऊस झाला. याबरोबरच काही ठिकाणी हलका पाऊस झाला.

मराठवाड्यातील आष्टी, गंगाखेड, हिंगोली, पारंडा, वाशी १० मिमी पाऊस पडला. विदर्भातील गोरेगाव, तिरोरा २०, देवरी, लाखनी, मोर्सी, तुमसर १० मिमी पाऊस पडला.

घाटमाथ्यावरील कोयना (नवजा) १७०, अम्बोणे १००, कोयना (पोफळी), शिरगाव ७०, खोपोली, वळवण ६०, ताम्हिणी, डुंगरवाडी ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रविवारी दिवसभरात कोल्हापूर, महाबळेश्वर, मुंबई, सांताक्रूझ, पणजी, डहाणु, पुणे, ब्रम्हपुरी, वर्धा येथे हलका पाऊस झाला.

पुढील दोन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २३ व २४ जून रोजी चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या पाच जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.