पुणो : शहरात आज पावसाने अचानकपणो हजेरी लावली. सकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरार्पयत पडत होता. मात्र त्यात जोर नव्हता. भाऊबीजेनिमित्त आप्तांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पुणोकरांची पावसाने तारांबळ उडवली. शहराच्या मध्यवर्ती भागात 3 मिमी तर लोहगावमध्ये 4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
दिवसभर गारवा
4सकाळपासून पाऊस पडत असल्याने शहरात गारवा निर्माण झाला होता. दिवसभर हा गारवा जाणवत होता. दोन दिवसांपूर्वी 32 अंशाच्या घरात गेलेले शहराचे तापमान वेगाने घटून 23 अंशार्पयत खाली आले. ते सरासरीपेक्षा तब्बल 8.2 अंशांनी घटले होते. कमाल आणि किमान तापमानात अवघा 2 अंशाचा फरक होता. किमान तापमान 21.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पावसाळा संपल्यानंतरही यंदा दिवाळीत थंडीच अनुभवता न आलेल्या पुणोकरांना या गारव्याने थंडीचा फिल दिला.
पावसाची शक्यता
4आज दिवसभर रिपरिप पडणारा पाऊस पुढील 24 तास कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणो वेधशाळेने वर्तविला आहे.