शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 07:29 IST

जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरण पाणलोटक्षेत्रातील पावसाचा जोर मंगळवारी दिवसभरात ओसरला होता. मात्र, त्यापूर्वी झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने खडकवासला

पुणे : जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरण पाणलोटक्षेत्रातील पावसाचा जोर मंगळवारी दिवसभरात ओसरला होता. मात्र, त्यापूर्वी झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने खडकवासला, गुंजवणी, कळमोडी, चासकमानसह ९ धरणांतून पाणी सोडण्यात आले.गेले दोन आठवडे झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.०६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात खडकवासला प्रकल्पातील धरणांत १६.७६ टीएमसी पाणीसाठा होता. वरसगाव धरणक्षेत्रांत मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत १०, पानशेत, ८, खडकवासला २ आणि टेमघरला २१ मिलिमीटर पाऊस झाला. टेमघरचा पाणीसाठा १.८९ (५०.९९ टक्के), वरसगाव ८.२२ (६४.०९ टक्के), पानशेत ९.९८ (९३.६७ टक्के) आणि खडकवासला धरण १.९७ टीएमसी इतके पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मंगळवारीदेखील ४०८ क्युसेक्सने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. पुणे शहरातदेखील दिवसभरात पावसाच्या काही सरी पडल्या. सायंकाळी ५ पर्यंत ०.२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद वेधशाळेत झाली.पिंपळगाव जोगा धरणक्षेत्रात ९, माणिकडोह २, येडगाव ६ आणि वडजला ७ मिलिमीटर पाऊस झाला. येडगाव धरणातील साठा २.७० टीएमसी (९६.५६ टक्के) झाल्याने येथून ३ हजार ७४९ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. कळमोडी परिसरात ११, भामा आसखेड १२, वडिवळे ३२, आंद्रा १५, पवना २८, कासारसाई ५ आणि मुळशी धरणक्षेत्रांत १३ मिलिमीटर पाऊस पडला.उजनीतील पाणीसाठा १५ टीएमसीवरजिल्ह्यातील धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात १५.९० (२९.६७ टक्के) टीएमसीपर्यंत वाढ झाली.