शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: January 8, 2017 03:25 IST

केडगाव (ता. दौंड) येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शहा यांच्या रेल्वे स्टेशन तपासणीदिवशी पहाटेचे रेल्वे वेळापत्रक कोलमडले. सकाळी ६.१५ वाजता पुण्यात पोहोचणारी सोलापूर पॅसेंजर तब्बल

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शहा यांच्या रेल्वे स्टेशन तपासणीदिवशी पहाटेचे रेल्वे वेळापत्रक कोलमडले. सकाळी ६.१५ वाजता पुण्यात पोहोचणारी सोलापूर पॅसेंजर तब्बल ३ तास उशिरा, मनमाड पॅसेंजर २ तास उशिरा, पटणा एक्स्प्रेस ९.३० तास, हावडा १.१० तास, हैदराबाद एक्स्प्रेस १३ मिनिटे, तर बारामती पॅसेंजर २८ मिनिटे उशिरा धावली.या सर्व गाड्या केडगाव स्थानकातून दौंडला उशिरा धावल्या. त्यामुळे गाड्यांना उशीर झाल्यामुळे ताटकळलेले प्रवासी सकाळी केडगाव येथील कर्मचाऱ्यांची स्थानक तपासणीमुळे पळापळ असे चित्र होते. एरवी दोन-चार कर्मचारी व अधिकारी असणाऱ्या स्थानकात शनिवारी १५ ते २० अधिकाऱ्यांचा फौजफाटा होता. एखाद्या शाळेची वार्षिक तपासणी असल्यावर शिक्षक व मुख्याध्यापकांची पळापळ होते. तशी धावपळ स्थानकात जाणवत होती. महिनाभर तयारी करूनही शनिवारी ऐनवेळी काही किरकोळ कामे चालू होती. त्यामध्ये तपासणीपूर्वी २ तास आधी काही कामगार प्लॅटफॉर्म रंगरंगोटी करीत होते, तर काही जण फरशी बसवत होते.एरवी चालूबंद असणारा ध्वनिवर्धक सातत्याने प्रवाशांना गाडी वेळापत्रकासंदर्भात सूचना देत होता. स्थानक एकदम स्वच्छ व चकाचक होते. सकाळी ११.३० च्या सुमारास महाप्रबंधक शर्मा यांचे आगमन झाले. स्थानकातील पार्किंग, हिंदी दिनानिमित्त प्रदर्शन पाहणी व गार्डन उद्घाटन केले. ग्रामस्थांच्या वतीने केडगावच्या सरपंच सारिका भोसले, बोरीपार्धीच्या सरपंच संगीता ताडगे यांनी स्वागत केले व समस्यांचे निवेदन दिले.प्रवाशांनी काही सूचना दिल्या. त्यांना समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न शहा यांनी केला. या वेळी पुणे रेल्वेचे प्रबंधक बी. के. दादाभॉय, रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा, हंबीरराव जेधे, मनोज होळकर, प्रशांत मुथ्था, दिलीप होळकर, पोपट चव्हाण, विनोद शिर्के, बाळासाहेब सोडनवर, सोमनाथ गडधे, ग्रामसेवक सुभाष डोळस, एम. के. केंच उपस्थित होते. सुमारे एक तासाच्या तपासणीनंतर शहा पुढील दौऱ्यावर रवाना झाले. या वेळी परिसरातील बहुसंख्य प्रवासी उपस्थित होते. एरवी अस्वच्छ वाटणारे स्थानक चकाचक पाहून प्रवासी मात्र सुखावले होते.