शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलरी दुकानावर तळेगावमध्ये दरोडा

By admin | Updated: October 3, 2015 01:06 IST

दहा ते बारा हत्यारबंद दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत वर्दळीच्या चौकातील तळेगाव स्टेशन येथील कमला ज्वेलर्सचे दुकान लुटले.

तळेगाव दाभाडे : दहा ते बारा हत्यारबंद दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत वर्दळीच्या चौकातील तळेगाव स्टेशन येथील कमला ज्वेलर्सचे दुकान लुटले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. यामध्ये रोख रकमेसह लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दुकानाचे मालक मनोज मोहनलाल पालरेशा (वय ४२) व मंगेश मोहनलाल पालरेशा (वय ३९, दोघहीे रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरडाओरडा ऐकून हाकेच्या अंतरावर असलेल्या तळेगाव स्टेशन चौकातील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी वाहतूक पोलीस नाईक विजय मारणे व विशाल सांगळे यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले. दरोडेखोरांनी बाजारपेठेतील दुकानांवर पिशवीतून आणलेल्या रेल्वे रुळातील खडींचा भडीमार केला. त्यांनी हवेत गोळीबार करून दहशत माजवली. त्यामुळे दुकानदारांनी पटापट शटर बंद केले. त्यानंतर काही दरोडेखोर कमला ज्वेलर्समध्ये घुसले. त्यातील काही जण दुकानाबाहेर थांबून, दगडफेक करून त्यांनी दहशत माजवली. दरोडेखोरांनी पालरेशा बंधूंना मारहाण केली. लाखो रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी तळेगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने पलायन केले. वाहतूक पोलीस व स्थानिक नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला असता दरोडेखोरांनी गोळीबार केला. पोलिसांना घटनास्थळी एक जिवंत काडतूस व पुंगळी सापडली. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीचा व अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार झाले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक विवेक पानसरे दाखल झाले.