पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची पुणे विभाग म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवसेना-भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात युती झाली आहे. त्यानंतर सरकारने विविध महामंडळाच्या नियुक्त्या केल्या आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना महामंडळावर घेत खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. युती झाल्यानंतर शिवसेनेने महापालिकेतील सत्तेत सहभाग मागितला आहे. भाजपने देखील सत्तेत सहभाग देण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिकेत देखील शिवसेना सत्तेत सहभागी होईल. कलाटे हे महापालिकेत शिवसेना गटनेते, स्थायी समिती सदस्य आहेत. शिवसेना शहरप्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे.
पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 16:42 IST
शिवसेना-भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात युती झाली आहे. त्यानंतर सरकारने विविध महामंडळाच्या नियुक्त्या केल्या आहे
पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे यांची नियुक्ती
ठळक मुद्देआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना महामंडळावर घेत खूश करण्याचा प्रयत्न