राहू : हर हर महादेवाच्या जयघोषात राहू येथील शंभो महादेवाला मानाच्या कावडीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत जलाभिषेक करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे चैत्रप्रतिपदा गुढीपाडव्याला राहू येथील शंभो महादेवाची यात्रा भरते. सकाळी ११ वाजता गावातील युवक मानाच्या कावडींना मुळा-मुठा नदीपात्रात आंघोळ घातली जाते. त्यानंतर घागर भरून वाजत गाजत कडा सर करण्यासाठी युवकांना मोठी कसरत करावी लागते. यामधून कडा सर करून शंभो महादेवाला जलाभिषेक घालण्यात आला. या वेळी महादेवाची कावड, गायकवाडांची कावड, गाढवे कुटुंबीयांची कावड, भुईआळीची कावड व पद्मावतीची कावड या समाजाच्या कावडीने जलाभिषेक घातला. या कावडी नाचविण्यासाठी वेगळ्या चाली वाजविल्या जातात. तमाशा व मांसाहारविरहित यात्रा हे येथील यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य.
राहूत हर हर महादेवचा जयघोष
By admin | Updated: March 28, 2017 23:47 IST