शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

मोकळ्या भूखंडावर होणार बागा

By admin | Updated: April 27, 2017 05:14 IST

बागेत फिरण्याबरोबरच आता खेळ, कारंजाबरोबरच संगणक प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास केंद्राचाही लाभ घेता येणार आहे.

पुणे : बागेत फिरण्याबरोबरच आता खेळ, कारंजाबरोबरच संगणक प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास केंद्राचाही लाभ घेता येणार आहे. काही भागात तर आता शेतीही होणार आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा उपक्रम सुरू केला असून, त्यासाठी सोसायट्यांनी अ‍ॅमेनिटी स्पेस म्हणून महापालिकेकडे हस्तांतर केलेल्या जागांचा वापर करण्यात येणार आहे.सोसायट्यांची; तसेच त्या परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन, त्यांना हवे ते उपक्रमच यात सुरू करण्यात येतील. यापैकी बाणेर येथे २ व बिबवेवाडी, वडगाव शेरी येथे प्रत्येकी १, असे एकूण ४ पार्क तयार करण्यात आले आहेत. वडगाव शेरी येथे चर्चच्या समोर महापालिकेला २ हजार १६३ चौरस मीटरची जागा अ‍ॅमेनिटी स्पेस म्हणून मिळाली आहे. त्यावर सेंद्रिय शेतीचे प्रयोग करण्यात येणार आहे. नव्या कल्पनांना वाव त्यासाठीची प्राथमिक तयारी करून देणारे एक इनोव्हेशन सेंटरही या पार्कमध्ये असेल. शहरातील समस्येविषयी काही उपाययोजना करून दाखवायची असेल, तर त्यांना या सेंटरमध्ये मुक्त प्रवेश असेल. बिबवेवाडी येथे सर्व्हे क्रमांक ६८५मध्ये ५६४.१४ चौरस मीटरचा भूखंड महापालिकेला मिळाला आहे. तिथेही ई-लर्निंग सेंटर व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. रिकाम्या पडलेल्या भूखंडावर आकर्षक लॅण्ड स्केपिंग करून झाडे वगैरे लावण्यात आली आहेत. बाणेर येथे सर्व्हे क्रमांक १३५ मध्ये १ हजार ३०९ चौरस मीटर जागेवर, तर सर्व्हे क्रमांक १४० येथे १ हजार २२६ चौरस मीटरवर हे पार्क झाले आहेत. त्यापैकी एका पार्कमध्ये ई-लर्निंग केंद्र असेल.लहान व्यवसायांमधील कारागिरांना काम अधिक कुशलतेने कसे करायचे, याबाबत शिकवण्यात येईल. दुसऱ्या पार्कमध्ये ध्यानधारणा केंद्र असेल. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या कल्पनेतून पार्क आकार घेत आहेत. त्यासाठीचा खर्च महापालिका, तसेच स्मार्ट सिटी साठीच्या निधीतून होत आहे. बागेत प्रवेश करण्यासाठी शुल्क नसले, तरी सुविधा वापरण्यासाठी माफक शुल्क आकारण्यात येणार आहे. खासगी संस्थांना ही केंद्रे चालविण्यासाठी देण्यात येणार असून, शुल्क आकारणीतून येणाऱ्या उत्पनातूनच त्यांनी केंद्रांचा खर्च करायचा आहे. (प्रतिनिधी)