शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्रीय सभेत राडा; प्रभागात तणाव

By admin | Updated: December 11, 2015 00:48 IST

खराळवाडी, गांधीनगर या दोन प्रभागांसाठी खराळवाडीतील बालभवन येथे क्षेत्रीय सभा सुरू असताना, दुपारी तीनच्या सुमारास उपस्थितांपैकी काहींनी थेट नगरसेवकांवर आरोप केले.

पिंपरी : खराळवाडी, गांधीनगर या दोन प्रभागांसाठी खराळवाडीतील बालभवन येथे क्षेत्रीय सभा सुरू असताना, दुपारी तीनच्या सुमारास उपस्थितांपैकी काहींनी थेट नगरसेवकांवर आरोप केले. त्यामुळे स्थानिक नगरसेवक सद्गुरू कदम यांनी संबंधितांना हटकले. त्यावर आक्षेप घेत कोणीही दादागिरी, दमबाजी करू नये, असे सांगण्याचा प्रयत्न नगरसेविका गीता मंचरकर यांनी केला. मंचरकर यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित काही महिलांनी त्यांच्यावर चाल केली. त्यांना धक्काबुक्की केली. शाब्दिक खडाजंगी आणि एकमेकांवर धावून जाण्याच्या प्रकाराने क्षेत्रीय सभेत राडा झाला. हा वादंग थेट पोलीस चौकीपर्यंत पोहोचला. संत तुकारामनगर पोलीस चौकीत नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती अ‍ॅड. सुशील मंचरकर, स्थानिक नगरसेवक कैलास कदम, स्वीकृत प्रभाग सदस्य हमीद शेख, माजी महापौर प्रकाश रेवाळे दाखल झाले. कार्यकर्ते, नागरिक यांचा मोठा जमाव संत तुकारामनगर पोलीस चौकीत जमा झाला. खराळवाडीत क्षेत्रीय सभेत झालेल्या राड्यामुळे दोन्ही प्रभागांत तणावाची परिस्थिती निर्माण झाली. बालभवनमध्ये प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी नागरिकांची क्षेत्रीय सभा घेण्यात आली. त्या वेळी नगरसेवकांचे प्रभागातील विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे, त्यांचे लक्ष भलतीकडेच आहे, असा आरोप एका कार्यकर्त्याने केला. त्या वेळी कदम यांनी त्या कार्यकर्त्यास हटकले. त्यावर कोणीही दमबाजीचा प्रयत्न करू नये, असे नगरसेविका मंचरकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी उपस्थित महिलांनी मंचरकर यांना धक्काबुक्की केली. अधिकारी दत्तात्रय फुंदे व अन्य अधिकाऱ्यांनी सभेतील राडा पाहून तेथून काढता पाय घेतला.(प्रतिनिधी)