शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

निकालानंतर राडा!

By admin | Updated: August 8, 2015 00:49 IST

जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या अत्यंत चुरशीच्या झाल्या. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विजयाचा उन्माद व पराभवाचे

जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या अत्यंत चुरशीच्या झाल्या. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विजयाचा उन्माद व पराभवाचे शल्य यामुळे काही ठिकाणी राडा झाला. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजविल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दंगलीत झाले. याप्रकरणी २२ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील ७ जणांना अटक करून आज घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे दोन गटांत भांडणे झाली. त्यानंतर या ठिकाणी आलेले पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्यावर बेछूट दगडफेक करून त्यांना जखमी करण्याचा प्रकार घडला. पोलिसांचे वाहन व एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रकार घडला. तर, शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे फटाके वाजविण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. ४५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, १२ जणांना अटक केली आहे.मंचरला घरात घुसून मारहाणमंचर : ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजविल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दंगलीत झाले. त्यामुळे भेकेमळा (मंचर) येथे रात्री धुमश्चक्री उडून सूर्यकांत थोरात यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. तसेच इतर दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी २२ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील ७ जणांना अटक करून आज घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.सूर्यकांत गिरिधर थोरात यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली आहे़ त्यात त्यांनी म्हटले आहे, की गुरुवारी रात्री ८ वाजता आकाश प्रकाश भेके व इतर लोकांनी गावातील बाळणपुरीबाबा मंदिराच्या बाजूला व पराभूत झालेल्या उमेदवार यांच्या घरासमोर फटाके वाजविण्याच्या कारणावरून आमच्यात आणि प्रकाश भेके व इतर लोकांमध्ये शाब्दिक वाद झाला. संभाजी निघोट व बाजीराव मोरडे यांनी प्रकाश भेके यास तुम्ही पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजवू नका असे सांगितले होते. त्या वेळी आकाश भेके व इतर साथीदारांनी शिवीगाळ करून बघून घेतो, अशी धमकी देऊन ते निघून गेले होते.त्यानंतर सूर्यकांत थोरात हे कुटुंबीयांसह झोपलेले असताना रात्री साडेबारा वाजता भेकेमळा येथील अविनाश भेके याने दरवाजा उघड असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. अविनाश भेके, उत्तम भेके, राजू भेके, प्रकाश भेके यांनी घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केली. भाऊ शशिकांतला प्रकाश भेके याने काठीने मारहाण केली. या वेळी त्यांचे सहकारी विविध दुचाकी वाहनांवरून तेथे आले. त्यांनी दगड, लाकडाचे ओंडके, विटांचे तुकडे सूर्यकांत थोरात यांच्या घरावर फेकून मारले. घराची कौले फोडली, लाईटचा मीटर तोडला़ तसेच दुचाकी फोडली़ त्यांच्या शेजारी राहणारे पांडुरंग दत्तात्रय थोरात यांच्या घरावर दगड मारून लाईट मीटर, दुचाकीचे नुकसान केले आहे. जयसिंंग बजरंग भेके यांच्या घरावर दगडफेक करून त्यांना दुखापत केली. तसेच चारचाकी गाडीचे नुकसान केले. (वार्ताहर)दगडफेकीत पोलीस जखमीइंदापूर : निमगाव केतकीत दोन गटांत भांडणे झाली. त्यानंतर या ठिकाणी आलेल्या पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्यावर बेछूट दगडफेक करून त्यांना जखमी करण्याचा प्रकार घडला. पोलिसांचे वाहन व एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रकार गुरुवारी (दि. ६) रात्री घडला. त्यात ९ जण जखमी झाले आहेत. त्यांमध्ये एका हवालदारासह ३ होमगार्ड व २ महिलांचा समावेश आहे.इंदापूर पोलीस ठाण्यात ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. एकूण ३० ते ३२ जणांना गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव यांच्या केतकेश्वर ग्रामविकास पॅनलची सरशी झाली. विजयाच्या उन्मादात अतुल ऊर्फ बाबू राऊत, त्याचे सहकारी अमोल राऊत, शंकर ननवरे, उमेश राऊत, अशोक राऊत यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास निमगाव केतकी गावाच्या हद्दीतील पराभूत गटाच्या चंद्रकांत राऊत यांच्या घराजवळ दुचाकी नेऊन गोंगाट केला. यावरून झालेल्या वादावादीतून अतुल राऊत व १० ते १२ जणांनी चंद्रकांत राऊत व त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांना समजली. ते सहकाऱ्यांसह सायंकाळी तेथे गेले. या वेळी ‘केतकेश्वर ग्रामविकास पॅनल’ची मिरवणूक सुरू होती. त्यामुळे ती थांबवून पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पॅनलप्रमुख देवराज जाधव व त्यांचे कार्यकर्त्यांना ‘मिरवणूक काढू नका’ अशी तंबी दिली. मात्र, त्यांनी मिरवणूक काढणारचं, असे म्हणत पोलिसांवर दगडफेक केली. त्यात हवालदार सुभाष दळवी व तिन्ही होमगार्ड जखमी झाले. पोलिसांच्या वाहनाच्या व लातूर-बारामती एसटी बसच्या काचा दगडफेक करून फोडल्या. दरम्यान, सहकाऱ्यांसह आपण सायंकाळी कान्होबामळा येथील मारुती मंदिरात नारळ फोडत असताना निवडणुकीतील पराभवाचा राग धरून, ‘तू आमच्या रस्त्याने जायचे नाही,’ असे म्हणत उत्तम राऊत याने आपल्या डोक्यात विळा मारून जखमी केले़ तसेच, सुनील राऊत, पराग राऊत, चंद्रकांत राऊत यांनी शिवीगाळ करून, मारहाण केली, अशी तक्रार राऊत यांनी केली आहे. (वार्ताहर)