शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर सुरक्षारक्षक जाळ्यात

By admin | Updated: June 4, 2017 05:30 IST

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सुरक्षारक्षकास ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी पकडले.

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सुरक्षारक्षकास ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी पकडले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.संतोष संभाजीराव पवार (वय ४४, रा. दामोदर सोसायटी, लेन नं.४, रो हाऊस नंबर २, नवग्रह मारुती मंदिराजवळ, बिबवेवाडी) असे संशयिताचे नाव आहे. सुरक्षा एजन्सी चालकास पवार यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती. पालिका भवनासमोरील एका हॉटेलमध्ये किशोर गिरमे या साथीदाराकरवी ४ लाख रुपये स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले. याबाबत ज्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, त्यांची सुरक्षा एजन्सी असून, त्यांच्याकडे असलेले सुरक्षा कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट संपले आहे. नवी टेंडर प्रकिया राबविण्यासाठी मुदतवाढ देण्याचा अहवाल पाठविण्याचे अधिकार संतोष पवार यांच्याकडे होते. त्यासाठी पवार यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती.१० लाख रुपयांपैकी पहिला हप्ता ४ लाख रुपये स्वीकारण्याचे त्याने कबूल केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक जगदीश सातव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.