शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणारा पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: April 1, 2017 02:24 IST

कारागृहामधून सुटल्यानंतर शहरात घरफोड्या करणाऱ्याला खडक पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे

पुणे : कारागृहामधून सुटल्यानंतर शहरात घरफोड्या करणाऱ्याला खडक पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला असून, पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. रियाज शाकीर शेख (वय १९, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खडक पोलिसांकडे कुमार भीम जाधव (वय २९, रा. गंज पेठ) यांच्या घरामधून ४५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना रविवारी घडली. हा गुन्हा शेख याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आरोपीने जाधव यांच्यासह पल्लवी महारुद्र कसबे (रा. गंज पेठ) यांच्या घरामधून सोनसाखळी व रोकड लंपास केली होती. तर, स्वाती बापू डोलारे (वय ३२, रा. एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ) यांच्या घरामधून मोबाईल चोरलेला होता. नाथाबा अंबरनाथ फासगे (वय ३५, रा. लोहियानगर) यांच्या घरामधूनही चोरट्याने एक मोबाईल लंपास केला होता. यासोबतच आणखी तीन गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याविरुद्ध एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. तो १४ फेब्रुवारी रोजी येरवडा कारागृहामधून जामिनावर सुटून आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. बारुळकर यांनी १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी आणखी एका अल्पवयीनास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या २ दुचाकी जप्त केल्या आहेत. गाडी चालवण्याचा छंद असल्यामुळे तो वाहने चोरत होता. गाडीतील पेट्रोल संपल्यावर ही वाहने तेथेच सोडून तो निघून जात असे. ही कारवाई उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे यांच्या पथकाने केली.