शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभाव कोमात; शेतकरी तोट्यात

By admin | Updated: December 22, 2016 23:59 IST

पुरंदर तालुक्यात पावट्याची पिके चांगली आहेत. पावटा पिकाची शेतकऱ्यांनी केलेली काळजीपूर्वक देखभाल, स्वच्छ हवामान यांमुळे

गराडे : पुरंदर तालुक्यात पावट्याची पिके चांगली आहेत. पावटा पिकाची शेतकऱ्यांनी केलेली काळजीपूर्वक देखभाल, स्वच्छ हवामान यांमुळे पावटा पिकाचे प्रचंड उत्पादन झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ढासळलेले शेतमालाचे बाजारभाव अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. नोटाबंदीचा फटका पावटा उत्पादकांनाही बसला आहे. तसेच, आवक वाढल्यामुळे पावट्याचे बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे पावटा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.पावट्यामध्ये औषधी गुणधर्म असून, तो चविष्ट व पौष्टिक आहे. त्यामुळे खवय्ये पावट्याच्या हंगामाची वाट पाहतात. पुरंदर तालुक्यात शेतकरी पानवडी पावटा व इतर वाणाच्या पावट्याची लागवड करतात. पुरंदरमधील हवामान या पिकासाठी अनुकूल आहे. शेतकरीही पावटा पिकाची उत्तम देखभाल करतात. त्यामुळे पावट्याचे भरपूर उत्पादन निघते. तसेच, पुरंदर तालुक्याला खेटून लगतच पुणे शहराची मोठी बाजारपेठ असलेने चांगली विक्री होऊन नफा मिळतो. परंतु, यंदा विक्रमी उत्पादन होऊन जास्त आवक वाढल्यामुळे बाजारभाव घसरले, तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे पावटापिकाचे बाजारभाव कोसळले आहेत. याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे.पावटा उत्पादक शेतकरी तानाजी नाटकर म्हणाले, ‘‘दर वर्षी पावट्याचे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे प्रपंचाला हातभार लागतो; परंतु यंदा मात्र पावट्याची पिके खूप चांगली येऊनदेखील बाजारभाव कोसळल्यामुळे उत्पादनखर्चही निघत नाही. सगळा तोटाच झाला आहे.’’