शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:13 IST

श्री महागणपतीला आकर्षक सुवर्ण अलंकार व फुलांची सजावट करण्यात आली असल्याची माहिती विश्वस्त डॉ.संतोष दुंडे यांनी दिली.संकष्टी चतुर्थी ...

श्री महागणपतीला आकर्षक सुवर्ण अलंकार व फुलांची सजावट करण्यात आली असल्याची माहिती विश्वस्त डॉ.संतोष दुंडे यांनी दिली.संकष्टी चतुर्थी निमित्ताने

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वा.श्रींची अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने दु.१२ वा. महापुजा व महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आल्याचे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांनी सांगितले. दर चतुर्थी प्रमाणे याही चतुर्थीला प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने अर्पण करण्यात आलेल्या फुलांची मंदिर व परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.

लॉकडाऊनच्या कालखंडानंतरची दुसरी व नविन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री महागणपतीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ.संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.लॉक डाऊन नंतर १६ नोव्हेंबर पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

दररोज मंदिर व मंदिर स्वच्छ करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक गोऱ्हे यांनी सांगितले.

------------------------------------------

फोटो:रांजणगाव गणपती येथील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.