शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कमकुवत पोलीस यंत्रणेमुळे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 01:04 IST

एका पोलीस दूरक्षेत्रावर व दोन पोलिसांवर २५ ते ३० गावांची जबाबदारी, अनेक दूरक्षेत्रात दूरध्वनीचा अभाव, अपुरे कर्मचारी, बंद पडलेल्या पोलीस व्हॅन यांमुळे फिर्याद दाखल होण्यास ४ ते ५ दिवस

एका पोलीस दूरक्षेत्रावर व दोन पोलिसांवर २५ ते ३० गावांची जबाबदारी, अनेक दूरक्षेत्रात दूरध्वनीचा अभाव, अपुरे कर्मचारी, बंद पडलेल्या पोलीस व्हॅन यांमुळे फिर्याद दाखल होण्यास ४ ते ५ दिवस, तर तपासाला महिनोन्महिने लागतात, अशी अवस्था आहे भोर तालुक्यातील पोलीस ठाण्यांची. पुणे-सातारा महामार्गावरून वारंवार जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, विविध सणांच्या बंदोबस्तासाठी लागणारे पोलीस, यामुळे अगोदरच कमी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. पोलिसांच्या संख्येसंर्दभात आजही ब्रिटिशकालीन नियमांची अंमलबजावणी होत आहे.२०११ च्या जनगणनेनुसार भोर तालुक्यात १९७ गावे व १५५ ग्रामपंचायती असून, सुमारे एक लाख ८२ हजार लोकसंख्या आहे. तालुक्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडतात. पूर्व भागातून पुणे-सातारा महामार्ग जात असल्याने दररोज तीनचार अपघात घडतात. पेट्रोलपंपावर दरोडे पडतात. हॉटेलसमोर थांबलेल्या गाड्यांमध्ये चोऱ्या होतात. त्यामुळे हा भाग कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. महामार्गावर खेडशिवापूर, शिंदेवाडी, राजगड, किकवी ही पोलीस दूरक्षेत्र येत असून, ७० ग्रामपंचायती आहेत, तर भोर पोलीस ठाण्यांतर्गत हिर्डोशी व पसुरे ही दोन पोलीस दूरक्ष्ोत्र आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांत कर्मचारी अत्यंत कमी असून, तालुक्यात अचानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर पोलीस पाठवावे लागत असल्याने उपलब्ध पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.तालुक्याचा पूर्व भाग दुर्गम डोंगरी व दाट झाडी, वर्दळ कमी असल्याने खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या भागाचा सर्रास वापर केला जातो. नीरादेवघर धरण भागात ३१ गावांना हिर्डोशी हे एकमेव दूरक्षेत्र आहे. तेथे दोन हवालदार काम करतात. या भागात दारूचे अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक गावात त्याची विक्रीही करतात; मात्र त्याकडे पोलीस काणाडोळा करीत असल्याने गावा-गावांत वादावादी होते. यातून गुन्हेगार निर्माण होत आहेत, तर भाटघर धरण भागात पसुरे हे दूरक्ष्ोत्र असून, २१ गावे संवेदनशील आहेत. या भागातही दोन पोलीस दोन हवालदार काम करतात.पोलीस कर्मचारी कमी असल्याने व स्वत:चे वाहन नसल्याने खासगी वाहनाचा वापर करावा लागतो. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबरोबर त्यांना वाहनांची व्यवस्था करणे, नवीन पोलीस दूरक्षेत्र वाढविण्यासह मंजूर पोलीस दूरक्षेत्र असलेल्या गावात इमारती बांधणे गरजेचे आहे. पोलिसांनी खाकीचा वापर करून प्रामाणिकपणे काम केल्यास सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार आहे. मात्र, त्यासाठी पोलिसांच्या प्रमुखांनी पुढाकर घ्यायला हवा, तरच ते शक्य होणार आहे.