शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

‘नीरा-देवघर’च्या रखडलेल्या उजव्या कालव्याचा प्रश्न मार्गी

By admin | Updated: January 18, 2015 23:47 IST

नीरा-देवघर प्रकल्पातील उजव्या कालव्याचे १ ते १० किलोमीटरपर्यंतची निविदा काढण्यात आली असून, सुमारे १५ कोटींची तरतूद करण्यात आली

भोर : नीरा-देवघर प्रकल्पातील उजव्या कालव्याचे १ ते १० किलोमीटरपर्यंतची निविदा काढण्यात आली असून, सुमारे १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ३१ जानेवारीपर्यंत ११ ते २० किलोमीटरपर्यंतची निविदा काढण्यात येणार आहे. येत्या २ वर्षांत ही कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भोर, वेल्हे तालुक्यातील नीरादेवघर व गुंजवणी-चापेट प्रकल्पांतर्गत रखडलेले कालवे, उपसाजलसिंचन योजना, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व खापरपणतूपर्यंत दाखले, तसेच धरणात गेलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत आढावा बैठक नुकतीच मुंबई आयोजित केली होती. या वेळी शिवतारे यांनी वरील सूचना दिल्या. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यात काही प्रश्न मार्गी लागले, तर काही रखडले.१७ डिसेंबरला नागपूर येथे बैठक झाली होती. या वेळी याचा फेरआढावा घेण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. बैठकीला आमदार संग्राम थोपटे, जलसंपदा विभागाचे सचिव एच. पी. मेंढगिरी, कार्यकारी संचालक एस. एम. उपासे, सहसचिव व्ही. एम. कुलकर्णी, मुख्य अभियंता के. एम. शहा, अधीक्षक अभियंता ईश्वर चौधरी, कार्यकारी अभियंता बी. आर. पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, भोरचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार राम चोबे आदी उपस्थित होते. नीरादेवघर उजवा कालवा १ ते १५ किमीवरील पोटचाऱ्या व शेतचाऱ्यांची कामे शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या विरोधामुळे रेंगाळलेली आहेत. ती लोकांच्या सहभागातून पूर्ण करावीत, असेही या वेळी शिवतारे यांनी सांगितले. नीरादेवघर धरणातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी पुणे व सातारा यांना आदेश देण्यात आले आहेत. गुंंजवणी-चापेट धरणाच्या पाण्यात जाणाऱ्या साडेतीन किमी लांबीच्या महाड राज्य मार्गास पर्यायी रस्ता डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने साडेतीन कोटींचे अंदाजपत्रक कृष्णाखोरे विकास महामंडळाला सादर केले आहे. मात्र, त्यावर कोणताच निर्णय झाला नसल्याने या वेळी आमदारांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)